ज्ञानेश्वर – काय करावयास पाहिजे म्हणजे ती गती मिळेल?
ईश्वर ही चीज काय आहे याची आपण अद्याप जाणीव घेतली नाही. चैतन्य शोधण्यासाठी कोणाचा तरी हात धरावा लागतो. काठी निर्माण करावी लागते. ती काठी धरून तिथपर्यंत जावे लागते.
मानवी अवताराचे मर्म यातच आहे. ते मिळाले की, मग वेळच नाही. ते मिळविण्यासाठीच आपण जन्माला आलेलो आहोत. फार मोठे ओझे नाही, एकाग्र मनाने प्रयत्न केलास हे मिळेल.
मन एकाग्र होणे फार कठीण आहे, मग काठी शोधणे तर त्याहून पुढचे आहे. आपण सत्शुध्द भावनेने त्या जगत् नियंत्याला पाहण्याची इच्छा प्रदर्शित केलीत. तिच्यासाठी वाटचाल चालवली आहे.
एक संदेश आहे, “जी काठी शोधावयाची ती राजमार्गानेच जाणारी शोधा. इतर मार्गाची शोधलीत, तर मानव त्यातच गुरफटतो, मग त्यातून बाहेर पडणे किंवा निघणे फारच दुरापास्त आहे.
खाली, वरकरणी, वरवरच्या देखाव्याला भाळून चालणार नाही. मनुष्य या गतीने वाटचाल करतो, पण अंत:र्गतीने शोधावयास पाहिजे. ती एकदा मिळाली की, मग वेळ नाही. बोलविता धनी फार वेगळा आहे, तुम्ही आम्ही काहीही नाही. कार्याला पाठविणारा फार वेगळा आहे, आम्ही फक्त निमित्ताला कारण आहोत. तेव्हा याप्रमाणे अनुसंधनाने मानवाने वाटचाल करावी. ©️