सद्गुरु पदाचा महिमा अगाध आहे. ज्याला जे दिले, त्याचा तो अमृततुल्य ठेवा कोणीही हिरावून घेणार नाही. सेवेकरी आपल्या कृतीस क्षणीक चुकत असेल, तर ती ठेव कृतीप्रमाने कमी कमी होत जाते. ज्याप्रमाणे अकार, उकार, ओंकार याची कोणतीही स्थिती रहात नाही, त्याप्रमाणे तो आपण स्वतःकडून सद्गुरु चरणांवर अर्पण करतो.
सद्भावनेने, सत् आचरणाने जो सद्गुरू ठेवा जतन करतो, तो सद्गुरुमय होतो. अशा तऱ्हेने तो ठेवा सद्गुरु चरणांवर अर्पण करतो. ज्यावेळेला हा संचिताचा ठेवा तयार होतो, तो दुसऱ्या योनीत फेकल्यानंतर, हा संचिताचा ठेवा त्याबरोबर फेकला जातो आणि ही अमृततुल्य ठेव ज्याला मिळाली, त्याचे संचित सद्गुरु माऊली आपल्या शिरावर घेते. असत थोडे जरी असले, तरी ते त्याच्या संचिताला पात्र होते.
देवाण घेवाण आणि सद्गुरु कोण, हे ज्याला समजले तो सत् शिष्य महान कार्यांसाठी कर्तव्य करीत असताना कोणत्याही स्थितीचा विचार करीत नाही. माऊली तारक असते, मारक नसते. जो असत मार्गाने जातो, त्याला वठणीवर आणण्यासाठी अनेक तऱ्हेची लिला करावी लागते.
मानवांचे शुद्धीकरण, मानव मायावी जाळ्यात गुरफटलेला आहे. ते जाळे तोडून सद्गुरु चरणांवर लीन करण्यासाठीं कृती करावी लागते.
“सद्गुरु कोण?” हे ज्या सेवेकऱ्याने ओळखले नाही, त्याला सद्गुरु निराळे वाटतात. हा त्यांचा निव्वळ भ्रम आहे. सेवेकरी सज्ञान असेल तर तमा न ठेवता शिक्षा झाली पाहिजे. अज्ञान असेल तर त्याला एखादी गोष्ट (माफ) आहे. सज्ञान असेल तर क्षमा नाही.
कैलासपतीला न ओळखण्या इतका दरबार असमर्थ आहे का? हुबळी, धारवाड सप्त शृंगीचे तत्व आहे. त्या ठिकाणीं बसलेला साधू जनका बरोबरची ज्योत आहे. जी जनकाची स्थिती तीच त्याची स्थिती आहे. दरबारच्या कर्तव्याला चुकल्या नंतर कितीही महान ज्योत असली, तरी शिक्षेला पात्र होते. (समाप्त)©️