Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

अनासक्ती-२©️

अनासक्ती-२©️

सेवेकऱ्याने अंत:र्दृष्टीने पाहिल्यानंतर जी पाच तत्वे आहेत, ती निराकारी आहेत हे कळू लागते, मग ही पाच तत्वे आहेत, ती आकारी कशी केली? आणि कशासाठी केली? या पाच तत्वांचा एक आकार जमवून, त्या आकाराच्या आत निराकार बसले आहेत आणि आतल्या आत चुपचाप पाहत असतात. आकारी पिंजरा निराकारी केव्हा होतो? तेच सद्गुरु अविनाशी तत्व बाहेर पडल्यानंतर, आकारी पिंजरा निराकारी होऊ शकतो. पाच तत्वे पाच तत्वात मिलन झाल्यानंतर निराकारी होतात.

सेवेकरी जोपर्यंत सद्गुरु चरणात लीन नाही, सद्गुरु चरणांचा ठाव घेतला नाही, तोपर्यंत त्याला हे कसे कळावे, ते कसे करावे, कोणत्या बाजूने जावे, अशी सेवेकऱ्याची मनोभावना होते. सद्गुरूंचा अंत कसा मिळेल? सद्गुरु अह:र्निश सानिध्यात असावेत. क्षणोक्षणी त्यांचे दर्शन कसे होईल, अशी सेवेकऱ्यांच्या मनाची उद्विग्नता होते, पण असे होण्याकरता सेवेकऱ्याने काय करावे याचा विचार नको का करावयाला?

पूर्वीच्या महान संतांनी सांगितले, ते सद्गुरु चरणात लीन असल्याशिवाय सांगितले का? असे आताचे सेवेकरी होतील का? त्यांनी प्रत्यक्षात अनुभवावे, सद्गुरु चरणात गुंग व्हावे. ज्यांनी सद्गुरू चरणांचा ठाव घेतला, प्रत्यक्षात अनुभवले ते श्रेष्ठच आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी लिखाण करून ठेवले. संतांनी लिखाण केले, कष्ट केले ते सद्गुरु कृपेने केले. तसाच आताच्या सेवेकर्‍यांनी देह झिजवावा. मग सद्गुरु वळण का देणार नाहीत? त्यांच्याकडून का करुन घेणार नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या सेवेकऱ्यांनी लिखाण करून ठेवावे ही इच्छा आहे. अशा तऱ्हेने सेवेकरी राहिल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची न्यूनता भासणार नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page