पडिले वळण इंद्रिया सकळा………..यांनी असे का म्हटले? स्वतःच्या वरून सांगितले की इतरांवरून सांगितले?
त्यांनी तो स्वतःचा अनुभव सांगितला. जो भक्तीत रममाण झाला, त्याला लबाड, दुश्मन, चांडाळ दिसत नाहीत. पाप पुण्य समजत नाही. तो एकातच रममाण झालेला असतो. म्हणून म्हटले आहे, पडिले वळण इंद्रिया सकळा ! पण ते कधी आणि केव्हा?
ते संत रात्रंदिवस सद्गुरु ध्यानात निमग्न झाले होते. पण प्रकृतीचा तरी अंत लागलेला आहे का? प्रकृतीत कोण वास करतो, हे कोणी पाहिले आहे का?
अघोर भक्तीने जो जातो, त्याला नमस्कार चमत्कार पाहावयास मिळतात, तो सतापर्यंत येऊ शकत नाही. कारण इंद्रियांना वळण सत पाहिजे. मग वागणूक कशी ठेवली पाहिजे? सत भक्ताचे कर्तव्य कोणते आहे? खेळीमेळीचे वातावरण आहे, तेव्हा निष्कारण वेळ घालविण्यापेक्षा अखंड तिजोरीत रममाण झालात, मग प्रकाश लांब आहे का? तुमची इंद्रिये इकडे तिकडे का बोकाळतात? तुमची इंद्रिये सतात निमग्न झाली नाहीत, असे मी म्हणू का? का अजून बाकी आहेत असे म्हणू? पूर्वीच्या संतांप्रमाणे जर ध्यानधारणा ठेवली, तर प्रकाश लांब आहे का? कोणालाही अप्रकाशित ठेवलेले नाही. पण वाचाळता जास्त असली तर प्रकाश कुठे आणि काय? ते सापडत नाही. (पुढे सुरु….३) ©️