ज्योती जन्माला जेव्हा टाकतात, त्याचवेळेला त्याची सर्व व्यवस्था केली जाते. त्या ज्योतीला त्याची फिकीर नसते. मानव किंवा ती ज्योत वयात आली की, मायेत गुरफटते. त्या ज्योतीच्या कुटुंबात किंवा त्याच्या ठिकाणी कितीही ज्योती असल्या तरी ती मायेशिवाय राहत नाही. ज्योत जशी खेळकर होते, तस तसे ती मातेचे सुद्धा ऐकत नाही. खेळकर ज्योत आपल्या साथीदारांबरोबर बागडत असते.
त्यापुढे वयोमर्यादेत आल्यानंतर दोन हाताचे चार हात होतात. नंतर बाकीच्यांचा विचार करीत करीत सर्व कृतीकडे दुर्लक्ष होते, मग आपल्या साथीला असणाऱ्या ज्योती शिवाय बाकीच्या ज्योतींचे मानत नाही. ऐकत नाही.
असे वागत वागत गेल्यानंतर त्याला आकाश ठेंगणे वाटू लागते. ती ज्योत सैराट वागू लागते. मागचा पुढचा विचार मुळातच राहत नाही. असे झाल्यानंतर ज्योत वाहू लागते. अडीअडचणी निर्माण होतात. प्रसंगाला कोणी उभे राहत नाही. त्याला उपदेशाच्या गोष्टी कोणी सांगितल्या तर त्याचा परिणाम होऊ शकत नाही.
कशाची स्थित्यंतरे आहेत ही? मनुष्य ज्या वेळेला अडचणीत सापडतो त्यावेळी त्याला सोडविणारा कोणी भेटतो का? अशा प्रसंगात ज्योत सापडल्यानंतर अनेक अडचणी त्याच्या भोवती निर्माण होतात. शेवटी जीवनाला सुद्धा ती ज्योत कंटाळते. मानवांना ही जाणीव नाही. (पुढे सुरु….२)©️