भक्ती कशाला म्हणतात?
प्रत्येक सेवेकऱ्याच्या अंगी लिनता, नम्रता आणि शांती असलीच पाहिजे. जे जे सेवेकरी सांगितलेल्या वळणाने चालतील, त्याबाबत आपणांस सर्वस्व माहीत झालेले आहे. मग त्याप्रमाणे वागावयास नको का? प्रत्येक सेवेकऱ्याच्या पाठीमागे मालिक छायेसारखे असतात. मग त्यांनी घालून दिलेल्या वळणाने वागावयास नको कां?
आपण एकच लक्षात ठेवणे – उपदेश कोणी दिला? देणारे कोण? सेवेकरी या नात्याने जो उपदेश, त्याप्रमाणे वागावयास नको कां? आपल्या कर्मसंचिता प्रमाणे जो ठेवा, त्याचे जतन करून, त्याचा पुढे उपयोग करावयाचा आहे. आपली मायावी कार्ये पार पाडून ही कार्ये करावयाची असतात. म्हणजे “संसार करूनच परमार्थ” ही काय चीज आहे, याची जाणीव होईल. अशा रितीने वागल्यास आपल्या गुरुंना किती आनंद होईल? त्याप्रमाणे वागून सर्वस्व आनंदमय करण्याचे सेवेकऱ्यांचे काम आहे. मायावी प्रमाणे जी कृती, ती करावयास नको कां? ती सोडल्यावर कार्य कशी होतील?
काहीजण म्हणतात, “मालकांना सर्वस्व अर्पण केले! काय केले? आपण अर्पण करणारे कोण? सद्गुरू अंत:र्यामी असतात, तेच सर्वस्व करतात. ©️