सेवेकरी म्हणतील, येथून उतरल्यावर आसन रिकामे असते, तर आसन कधीही रिकामे नसते. मालिक येथेच बसलेले असतात. स्थूलांगी तिकडे जातात. आपण काहीही केले, तरी त्यांच्या नजरेतून सुक्ष्माहूनही सुक्ष्म सुटत नाही.
तुम्हीं प्रथम आपल्या गुरूंचे दर्शन मिळविले तरच पुढे मार्ग मिळेल. गुरू दर्शन सोपे नाही. गुरू दर्शन हाच शेवट मुक्तीचा मार्ग आहे. ज्याने मिळविले, तो धन्य होय. त्यानेच मानव जन्मात येण्याचे सार्थक केले असे होईल.
मानव हा कसा असतो? त्याला माया हवी असते. कितीही वळण घालण्याचा प्रयत्न केला तरी तो आपल्या तालातच असतो. मानवाचे मन तालात असते. तेच जर शुद्ध असेल, तर दाही इंद्रिये ताब्यात येतील. तेच जर गढुळ झाले तर सर्वस्व गढुळ होईल. काही सेवेकरी असत मार्गाला जातात. त्यांना मालिक, लिला, लाघव करून, जाग्यावर आणतात. ते का? तर असत मार्गानें जावू नये म्हणून !
पूर्वी आर्यावर्तात गुरुकुलांत जी मुलें शिकत असत. त्यांना एवढी वळणे नव्हती. एकच धडा देत असत. तो करीत ते बसत असत. या ठिकाणी कितीतरी पटीने ज्ञान मिळते. सर्वस्व सांगण्यात येते. तरी सेवेकरी करीत नाहीत. ह्या मार्गाने जात नाहीत. पूर्वी एकच धडा देवून नाना तऱ्हेने त्याचा कस घेतला जात असे. त्या कसाला ते उतरत असत.
आता काळ नवीन आहे. मानवांच्या मनाप्रमाणे नवीन आहे. मानवाच्या मनात अविनाशी आत्मा जागृत नसेल, तर मानव काय करणार? जागृत म्हणजे कसा? त्यानें जर कृपादृष्टीने पाहिले नाही, तर चलन वलन कसे होईल? म्हणून जागृत म्हटले आहे. (समाप्त) ©️