आत्मा म्हणजे काय? तर, आत असणारी ज्योत, चैतन्य । जडत्वाच्या आत असणारे, चत्वार खाणीत असणारे, सर्व ठिकाणी आकाराच्या आत असणारे, स्वयमेव तत्व तोच आत्मा । त्याच्या प्रकाशाने वाटचाल करणे याचा बोध कोणी घेतला आहे कां?
अकार व उकार या दोन्हींचा संवाद चालतो. तो बोध कोणी घेतला आहे का? जडत्वात स्वयमेव तत्व जर नसेल, तर ते जडत्व काहीही करू शकणार नाही. तरी देखिल मानव म्हणतो, “मी करतो” । कोणी म्हणतो, मला हा व्याप आहे. याचा अर्थ काय? कृती घडवून घ्यावयाची, ती चुकणार आहे का? कर्तव्य कुणाला सुटले आहे? मग मी करतो, हे सिद्ध होते का?
मग सेवेकरी म्हणा, मानव म्हणा पाठीपुढे का होतो? म्हणजेच, याला म्हणायचे माया । माया ही चंचल जरी असली तरी चंचलपणामध्ये सेवेकरी आतबाहेर, पाठीपुढे करीत असतो. मायेच्या आधीन बनणे चुकीचे आहे. मग त्याने आत्मबोध चाखायला नको का? जो मायेला कलाटणी देतो, मागे हटवतो, तोच आत्मबोधाची प्रचिती घेऊ शकतो. मग सांगा, कोणी कोणी आत्मबोधाची प्रचिती घेतली आहे? घेतली आहे म्हणावे तर पाठीपुढें का होता? जरी पाठीपुढे झालात, तरी जे भोगत्व आहे ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. आता जरी कलाटणी दिली, तरी पुढे ते भोगलेच पाहिजे. यातून मोकळा झाल्यावर कर्मसंचितातून शुद्ध स्फटिकाप्रमाणे मोकळा होईल. पुढे सत् तत्त्वाने, सत् मार्गाने जाऊ शकतो.
पण सेवेकरी मोकळा होईल का? सताचे सानिध्य आहे, तोपर्यंत तरी मोकळा होईल अशी अपेक्षा करावी का? तो सत् ठेवित जाईल का? सेवेकरी स्फटिकासारखा मोकळा होईलच, त्याची हमी कोणी घेऊ शकेल का? मग त्याला मार्ग कोणता आहे? आता तरी मी सत् संचिताचाच वाटेकरी होईन असे कोण्या सेवेकर्याच्या मनात उद्भवले का? सत् मार्गाने जाईल का? या सत् मार्गाने सत् सानिध्यात वाटचाल करील असे मानावे का मी? का त्यातूनही असत संचित वाढविल?…..(पुढे सुरु २)©️