कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच ! कोळसा जर तेजाळत नाही तर त्याला किती उगाळणार?
तेव्हा दृश्य तेजाळले पाहिजे. कोणत्याही चाकोरीत फेकले तर विचार उच्च कोटीचे पाहिजेत. उच्च पातळीचे विचार नसतील तर दृश्याची काहीच किंमत नाही. गल्लीबोळात फिरणाऱ्या कुत्र्यासारखी त्याची अवस्था असते.
समर्थांनी सांगितले आहे की, “त्रिभुवनात किती फुले फुलतात, पण ठराविकच माझ्या चरणांजवळ येतात. तसेच ठराविक ज्योतीच माझ्यापर्यंत येतात”.
पूर्वीचे ऋषीमुनी दृश्यच होते, पण त्यांनी आपले मन समर्थ चरणांवर लय केले, नाममय केले, यामुळे ते उच्च गतीला गेले. पण हे सर्व व्हायला कारण काय? फुले गळून का पडतात? फुल सुंदर असते. पहाणाऱ्याला मोह निर्माण होतो. पाहणारा स्वतःच तिकडे जातो, ही जशी धारणा तशीच धारणा असते.
मनुष्य हैवाण का बनतो? तर वाईट विचार, लबाड्या, बनवाबनवी आणि क्षणिक लोभासाठी लाख भानगडी. अशाला मी म्हणतो, “किडे जसे सर्व ठिकाणी असतात, अशी यांची गती असते.” दोन हात एकत्र होतात तेव्हा नमस्कार होतो. तद्वत हे आहे. म्हणून लक्षात घ्या, मन पूर्णत्वाने समर्थमय होईल तर त्याला तनाचे व धनाचे काही वाटणार नाही. ज्याचा आपल्या विचारावर ताबा नाही, तो कसली भक्ती करणार? समर्थ म्हणतात, “मी माझ्या ऋणातून मुक्त होत असतो.” ते समजून सांगतात. अशाप्रकारे स्थित्यंतरे होतात. ©️