Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

नि:ष्काम भावना……©️

नि:ष्काम भावना……©️

रामदास, ज्ञानदेव यांचे उदाहरण घ्या. ते कसे नि:ष्काम होते. त्यांची भावना नि:ष्काम होती. पार्थाला सुद्धा भगवंताने सांगितले, “तुझा हा सर्वस्व भ्रम आहे. तुला फक्त निमित्ताला उभे केले आहे. तू फक्त निमित्तासी कारण आहेस, मारविता मीच जाण, ते कसे ते बघ.” लाघवी रूप धारण केले. दृश्य रूप प्रगट केले. पण, त्याला पाहता येईना. त्यांनी त्याला धीर दिला. दिव्य दृष्टी दिली. तरी सुद्धा पाहता येईना. त्याला त्यांनी सांगितले, ”घाबरू नकोस.” याप्रमाणे त्याला आढावा मिळाला. जाणीव करून दिली. “पार्था, तू निमित्त मात्र आहेस.” हा पार्थाला त्यांनी चमत्कार करून दाखविला.

तसाच हल्लीच्या मानवाला चमत्कार लागतो. एवढे करून सुद्धा पार्थाला सांगितले, “तू जर केले नाहीस, तर तुझ्याकडूनच करून घेणार आहे.” तेव्हा हे सर्वस्व अव्यक्ताच्या आधीन आहे. पण हल्लीचा दृश्य मानव समर्थांना बनवतो, पण शेवटी तोच बनला जातो. आत्तापर्यंत समर्थांना कोणीही बनविलेले नाही.

मानवाला विचारले, तुझी चूक कोणती झाली? पण त्याला सांगायला लाज वाटते. आपल्या सद्गुरुना सांगण्यात लाज कसली? पण थोडीशी अब्रू आहे. मानव गर्विष्ठपणाने नटलेला आहे. तो “ग” ने बरबटलेला असतो. त्याला अब्रू असते. तेव्हा दृश्याला गर्विष्ठाची ठेव पाहिजे कां? तर नाही. पण मानव म्हणतो, मी आहे. मी कोण हे त्याला सांगता येत नाही. पण जो आत वास करतो तेच तुमचे गुप्तधन आहे. त्याला अब्रू आहे कां? जो अब्रू म्हणतो, त्याला अहंकाराची भावना लपेटलेली असते. अहंकार रहित ज्योत नि:ष्काम गतीने वाटचाल करते. अहंकार युक्त ज्योत शंकाकुल असते. पण दृश्याला दृश्यांची आवश्यकता जरी असली तरी नि:ष्काम गतीने वाटचाल केल्यास आपली भावना नि:ष्काम ठेवल्यास दूषण लागत नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page