११) महामुनी गोपाळ – सेवेकऱ्यांत मुख्य म्हणून माझी निवड झाली होती. आदेश न मानता, मी कोणीतरी आहे, माझ्याशिवाय कार्य होत नाही, असा अहंपणा झाला. कार्याबद्दल विचारणा झाली असताना, जरी कार्य केले नसताना, झाले म्हणून सांगितले, त्यामुळे ही स्थिती !
१२) महामुनी मंगेश्वर – समर्थांचा सेवेकरी असताना सुद्धा इतर सेवेकऱ्यांबद्दल मनात द्वेष, द्वैत भावना ठेवली. हे सेवेकरी सेवेकऱ्यांत ठेवले म्हणून ही स्थिती !
१३) महामुनी पिपलेश्वर – घर कुटुंबात एका विचाराने राहीलो नाही. सदोदित आपल्या मनाचा हेका, त्यामुळे ही शिक्षा आहे.
१४) महामुनी जांबुकेश्वर – संसारात पती आणि पत्नी असतात, त्यात पत्नीचा अतोनात छळ करण्यात आला. मालकांचे संदेश ऐकले नाहीत.
१५) महामुनी जंबूकेश्वर – लोकांच्या लावालाव्या करणे, खोटे करणे, हे मी करीत होतो. यामुळे ही स्थिती !
१६) महामुनी पार्वश – कोणत्याही कार्यासाठी मालकांचे आदेश नसताना, मी कार्य करीत होतो. कोणत्याही सेवेकऱ्याला प्रकाश मिळाल्यानंतर तो आपल्या शक्ति प्रमाणे फिरत असतो. त्यावेळी मालकांचा आदेश नसताना, मी देवऋषीपणा केला. त्यामुळे ही स्थिती !
१७) महामुनी दिव्येश्वर – प्रत्यक्ष मालकांचे गादीसमोर असताना सुद्धा शिस्तीचा भंग केला. हाच गुन्हा !
१८) महामुनी सुनकेश्वर – जरी मोठी तप:श्चर्या असली, तरी मोठे म्हणता येणार नाही. चुकीशिवाय शिक्षा होत नाही. चुक घडली की शिक्षा ठरलेली आहे. मालकांचे हुकूम, आदेश याकडे दुर्लक्ष केले. आदेश धुडकावले म्हणून ही स्थिती.
१९) महामुनी शुकदेव – समर्थ माऊलींनी दिलेले आदेश मानले नाहीत. आसनाचे सेवेकरी एका नात्याचे असतात. एकाच मालकांची लेकरे असतात. एकच जीवाने राहण्याचे आदेश होते. गुरुबंधूत्वात द्वेष धरु नका, पण ते न मानता, सदोद्वीत द्वेष होता. एकाचीच बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न करीत असे. कित्येक वेळा सांगण्यात आले, परंतु मी न ऐकल्या सारखे केले त्यामुळे ही शिक्षा झाली!
२०) महामुनी अरुणेश्वर – ज्या मातोश्रीने जन्माला घातले, लहानाचे मोठे केले, अशा मातेचा अतोनात छळ करण्यात आला. म्हणून ही अघोर शिक्षा. तारुण्याच्या भरात मीपणा होता. याचे पुढचे भविष्य कोणी पाहिले? परंतु स्थूलातून बाहेर पडल्यानंतर मालकांचे बोल सत्यतेने पटले. (2)©️