Principle
कलीयुगातील चार नियम अर्थात श्री सद्गुरू माऊलींनी दिलेली चार वेदासमान तत्वे
परस्त्री मातेसमान मानने
परधन आपले नव्हें ह्याची जाण ठेवणे
मिथ्य भाषा वर्ज्य करने
मादक पदार्थ सेवन वर्ज्य
परस्त्री मातेसमान
या तत्त्वानुसार मानवाने चालले पाहिजे. या तत्त्वाचा अर्थ होतो की माता-भगिनी मग त्या कोणीही असोत, त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहू नये. त्यांचा नेहमीच मान-सन्मान, आदर करावा. त्यांच्याशी वर्तणूक करताना ती आदबशीर असावी. त्याना दुःख होईल असे कोणतेही कर्तव्य करता कामा नये. जसे आपण आपल्या मातेशी व्यवहार करतो, तसेच व्यवहार आपण इतर स्त्री वर्गाशी करावा.
परधन आपले नव्हें
परधन अर्थात दुसऱ्याचे धन. जे आपले धन नाही त्यावर वक्रदृष्टीने पाहू नये. दुसऱ्यांच्या धनाची अपेक्षा बाळगू नये. दुसऱ्यांचे धन लुबाडू नये. दुसऱ्यांच्या धनासाठी हपापू नये. परधनावर डोळा ठेवू नये. जे आपले धन नव्हें, त्याची अपेक्षा करू नये. परधनाची अपेक्षा कदापिही करू नये. परधनावर आपला हक्क दाखवू नये. याचाच अर्थ चित्ती असू द्यावे समाधान. इमाने-इतबारे वागणूक ठेवावी.
मिथ्य भाषा वर्ज्य
मिथ्य येणे खोटे अर्थात खोटे बोलू नये. आपल्या स्वार्थासाठी खोटे बोलने पाप समजावे. कोणत्याही कारणासाठी खोटे बोलण्याचा सहारा घेऊ नये. एक खोटे बोलले तर दुसरे खोटे बोलावे लागते याची जाण ठेवावी. खोटे बोलल्याने दुसऱ्याचे नुकसान होत असेल तर ते टाळावे. अर्थात खोट्या सर्व गोष्टी त्याज्य कराव्यात. जे जे मिथ्य आहे, ते ते त्याज्य समजावे.
मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य
मादक पदार्थ जसे मद्य, मद्यपान, नशीले पदार्थ ह्या गोष्टी त्याज्य कराव्यात. अशांचे सेवन करणे टाळावे. याच्या सेवनाने घरे-दारे उजाडली जातात, त्यामुळे त्यांचे सेवन वर्ज्य करावे. तसेच आरोग्यालाही धोका पोहचतो, म्हणून त्यांच्या आहारी जाऊ नये व त्यांचे सेवन करने टाळावे.
अशा प्रकारची ही चार तत्वे कलियुगामध्ये आपल्या माउलींनी दिलेली आहेत, त्यांचे काटेकोरपणाने पालन केल्यास मानवाला सन्मार्ग प्राप्त होतो. सन्मार्ग मिळाल्यामुळे मानव भगवंताच्या भक्तीत रममाण होऊ शकतो. भगवंताच्या भक्तीत रममाण झाल्यामुळे तो मानव भगवंताचे चरण पाहू शकतो. भगवंताचे चरण प्राप्त होणे अर्थात मुक्ती आणि मोक्ष होय. इतर दुसरा कोणताही मुक्ती मोक्ष नाही. त्यामुळे या चार तत्वांना कलियुगातील चार वेद समजावे व त्यांचे अनुसरण व पालन करावे. असे केल्याने आपले आरोग्य, मानसिकता, शारीरिक स्थिती स्थीर राहून, आपण आध्यात्मिक मार्गक्रमणा चांगल्याप्रकारे करू शकतो व त्या श्री सद्गुरू चरणांना प्राप्त करू शकतो.