Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

पडिले वळण इंद्रिया सकळा………..यांनी असे का म्हटले? स्वतःच्या वरून सांगितले की इतरांवरून सांगितले? त्यांनी तो स्वतःचा अनुभव सांगितला. जो भक्तीत रममाण झाला, …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

पडिले वळण इंद्रिया सकळा………..यांनी असे का म्हटले? स्वतःच्या वरून सांगितले की इतरांवरून सांगितले? त्यांनी तो स्वतःचा अनुभव सांगितला. जो भक्तीत रममाण झाला, …

Path

! ॐ तत् सत् !

सत् भक्तीचा प्रकाश

आपल्या भारत भूमीमध्ये प्रत्यक्षात भगवंताने अनेक अवतार नटवून त्याला पुनीत केलेले आहे. असा हा महान पवित्र व मंगलमय देश आहे. याच भारत भूमीमध्ये अनेक ऋषी, मुनी व तत्वज्ञानी जन्माला आले. सर्व विद्येमध्ये पारंगत असे ज्ञानी, साधू, संत, आचार्य महंत, याच भारत भूमी मध्ये निर्माण झाले.
एके काळी या देशामध्ये शूर, वीर, राजे आणि महाराजे आनंदाने नांदत होते. महान महान ऋषी मुनींचे आश्रम व गुरुकुलें या ठिकाणी होती. काव्य, शास्त्र, धर्म, नीति आणि सत् भक्ती या सर्वांमध्ये हा भारत देश अग्रगण्य होता. अशा या महान पवित्र भारत भूमीला अशी स्थिती कां यावी?
याचे कारण एकच – भक्तीचे मार्गदर्शन करणारे जे काही मानव सद्य: स्थितीत आहेत, त्यांनी आपले निष्काम कर्तव्य सोडून सर्वस्व स्वार्था साठीच हे चालविलेले आहे. ज्यात भक्तीभाव नाही, अर्थज्ञान नाही, अशा त-हेने अर्थशून्य आणि स्वार्थी अर्चन त्यांनी चालविलेले आहे. एकमेकांना सहकार्य करावयाचे सोडून स्वार्थ हेच ध्येय त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेविलेले आहे. ज्यांच्या ठिकाणी उच्च आणि नीच हा भेदभाव आहे. अशांचे कधीही भले होणार नाही.
क्रिया आणि वाचा यांत मेळ नसल्या कारणाने सर्वत्र दांभिकपणा आढळून येतो. यामुळे मानवांच्या ठिकाणी संशयाचें बीजारोपण झाले, त्यांची मनोभावना बदलली.
अखिल विश्वाचा चालक, मालक, पोषक आणि त्राता असा जो सर्व शक्तिमान परमेश्वर याला मानव विसरून गेलेत आणि म्हणून सत् भक्तीचा लोप होऊन मानव अधोगतीला गेले. स्त्री आणि पुरुष ही संसार गाड्याची दोन चाकें आहेत, पण या चाकांची गती सद्भक्तीचा लोप झाल्याकारणाने कुंठीत झाली आहे.
तेव्हां सत्भक्ती ही कोणत्या त-हेने करावी? हा मानवांपुढे मोठा गूढ प्रश्न पडतो. कारण ज्ञानमार्गी होऊन निर्गुण उपासना करणे संसारी जणांस कठीण वाटते. त्याचप्रमाणे योग, याग, व्रते, वैकल्ये आणि उपास-तापास करणे हा सुद्धा खडतर मार्ग आहे व वाटतो.
अशाने मन शुद्ध तर होणार नाहीच, पण ते कधीही आकळले जाणार नाही. तसेंच संसार आणि परमार्थ हे दोन निरनिराळे जीवनक्रम आहेत असें मानणा-यांस ईश्वरी साक्षात्कार होणे शक्य नाही. जवळ जवळ अशक्यप्राय स्थिती होय.
संसार आणि परमार्थ यांची सांगड घालून, लीनता, नम्रता आणि शांती ही तत्त्वे मनोमन पाळून सत् शुद्ध अंतःकरणाने जे आपली कर्तव्यकर्मे आचरणांत आणतात, नि:स्वार्थपणे भगवंताचे ठिकाणी अर्पण करतात, अशांनाच ईश्वराची ओळख होते. म्हणून भक्तीची प्रथम पायरी जी आहे, ती म्हणजे मनाची अंतःर्बाह्य शुद्धता ही होय. ही शुद्धता होण्यासाठी आणि मनाची नैतिक पातळी उंचावण्यासाठी खालील चार तत्वांचे पालन करणे नितांत आवश्यक आहे.

चार तत्त्वे

परधन

दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा न करणे

परस्त्री

परस्त्री आपल्या मातेसमान मानणे

खोटे न बोलणे किंवा खोटे न करणे

मिथ्य अथवा खोटे बोलणे नाही

मद्यपान व नशिले पदार्थ सेवन न करणे

मद्य प्राशन तथा मादक, नशिले पदार्थ सेवन व्यर्ज्य करणे.

संसार म्हणजे तरी काय ?

संसार म्हणजे सगुणाचे सार – येणे नाम संसार!

संसारांत सर्वत्र परमेश्वर सगूण रुपाने नटलेला आहे. संसार हाच मुळी असा आहे की, त्याला कर्म समुच्चय हे नांव देता येईल. त्या ठिकाणी कर्तव्य करीतच राहिले पाहिजे. परंतु ती कर्तव्ये करतांना त्यांत स्वतःला गुरफटून न घेता, तसेंच वासनेच्या आहारी न जाता, ईश्वरास प्रिय होतील अशीच कर्तव्ये आचरणांत आणावित. अशा मार्गानेच मनाला शांती मिळेल. जे काय होते ते आपल्या कृतीनेच होत असते.

हल्लीचे मानव कशाचे मागे आहेत, तर ऋद्धी, सिध्दी, तंत्र, मंत्र आणि वनस्पती अशा उपाधींच्या मागे त्याचे लक्ष लागलेले आहे. पण सत् तत्त्व कोठे आहे आणि कशामुळे ते अबाधित चालले आहे, याचा उगम कोणालाही सापडलेला नाही.

ऋद्धी आणि सिध्दी यापासून होणारे चमत्कार हे सर्व लाघवी मायेचे खेळ आहेत. त्याठिकाणी सत् तत्वाचा वास कदापि सापडणार नाही. सत् भक्तीच्या ठिकाणी चमत्कार आढळणार नाहीत. सत्भक्ती चमत्कार रहीत आहे. त्याठिकाणी जे चमत्कार असतात, ते स्वयम् आणि अखंड चमत्कार असतात. ऋध्दी, सिध्दी सारखे भुरटे चमत्कार नसतात. तेथे सत्भक्तीचा दीप अखंड तेवत असतो. तो विझवण्याची कोणाचीही प्राज्ञा नाही.

ऋद्धी आणि सिध्दी यापासून होणारे चमत्कार हे सर्व लाघवी मायेचे खेळ आहेत. त्याठिकाणी सत् तत्वाचा वास कदापि सापडणार नाही. सत् भक्तीच्या ठिकाणी चमत्कार आढळणार नाहीत. सत्भक्ती चमत्कार रहीत आहे. त्याठिकाणी जे चमत्कार असतात, ते स्वयम् आणि अखंड चमत्कार असतात. ऋध्दी, सिध्दी सारखे भुरटे चमत्कार नसतात. तेथे सत्भक्तीचा दीप अखंड तेवत असतो. तो विझवण्याची कोणाचीही प्राज्ञा नाही.

मानव हाच ईश्वरी अवतार आहे. ईश्वर आहे याची चिकित्सा मनु+ईष म्हणजेच मनुष्य होतो. पुढचा ईश घेतला तरच ईश्वर प्राप्ती होऊन मनुष्य हाच साक्षात ईश्वर आहे याची जाणीव होईल आणि मनु घेतला व ईश वगळला तर मनाच्या अधिन होऊन तो इकडे तिकडे सैरावैरा भटकत राहिल व हैवान बनेल. मग त्याला ईश्वर प्राप्ती अगर ईश्वर दर्शन होणे दुरापास्त आहे.

त्यासाठी अंतःकरणाचे ठिकाणी सारखी तळमळ ठेवली पाहिजे. तेव्हांच ईश्वर प्राप्ती होईल. वरपांगी ढोंगाने काहीही मिळू शकणार नाही. मनाचे ठिकाणी सद्गुरुं विषयी अढळ श्रद्धा, दृ:ढनि:श्चय, व प्रबळ ईच्छाशक्ति असली की सद्गुरु भेट आपोआप होते.

सद्गुरुं शिवाय स्वःप्रकाशाची दिशा सांपडणार नाही, तर मुक्ती मोक्ष कुठचा? सद्गुरु शिवाय तरणोपाय नाही. गुरु आणि सद्गुरु यामध्यें अंतर आहे.

सद्गुरुं शिवाय स्वःप्रकाशाची दिशा सांपडणार नाही, तर मुक्ती मोक्ष कुठचा? सद्गुरु शिवाय तरणोपाय नाही. गुरु आणि सद्गुरु यामध्यें अंतर आहे.

सत् हे फार अचल आहे. त्याचा कोणीही अजून अंत घेतलेला नाही, घेणे शक्य नाही आणि घेऊ शकणार नाही. असे हे परम् निधान आहे. यांना ना आदि, ना मध्य आणि ना अंत, असे हे परमतत्व सर्व ठिकाणी व्यापक असूनही अलिप्त आहे. तेव्हां मानवांनी सद्गुरु हे काय तत्त्व आहे? याचा प्रथम अनुभव घ्यावयास पाहिजे. त्याठिकाणी मनाची चलबिचल न करता ठाम व सत् शुद्धवृत्तीने व सद्भावनेने रत झाले पाहिजे. तरच त्या सताचा शोध लागेल. म्हणूनच अशांची भक्ती करणे ही महान तपःश्चर्या आहे.

भक्ती ही प्रत्यक्ष परमेश्वराने मनुष्य प्राण्याच्या उध्दारासाठी, सद्गुरुंच्या मुखाने देणगी म्हणून दिलेली भेट आहे. कारण ८४ लक्ष योनीं मध्ये, मानव योनी श्रेष्ठ आहे. मानव योनीतच सताची ओळख होते. म्हणून सहज, साधारण नाम म्हणजेच भक्ती. ते नामस्मरण अंतःकरणाच्या तन्मयतेने झाले पाहीजे. नामाशिवाय मनुष्य जन्माची गोडी लागत नाही.

सत् हे फार अचल आहे. त्याचा कोणीही अजून अंत घेतलेला नाही, घेणे शक्य नाही आणि घेऊ शकणार नाही. असे हे परम् निधान आहे. यांना ना आदि, ना मध्य आणि ना अंत, असे हे परमतत्व सर्व ठिकाणी व्यापक असूनही अलिप्त आहे. तेव्हां मानवांनी सद्गुरु हे काय तत्त्व आहे? याचा प्रथम अनुभव घ्यावयास पाहिजे. त्याठिकाणी मनाची चलबिचल न करता ठाम व सत् शुद्धवृत्तीने व सद्भावनेने रत झाले पाहिजे. तरच त्या सताचा शोध लागेल. म्हणूनच अशांची भक्ती करणे ही महान तपःश्चर्या आहे. भक्ती ही प्रत्यक्ष परमेश्वराने मनुष्य प्राण्याच्या उध्दारासाठी, सद्गुरुंच्या मुखाने देणगी म्हणून दिलेली भेट आहे. कारण ८४ लक्ष योनीं मध्ये, मानव योनी श्रेष्ठ आहे. मानव योनीतच सताची ओळख होते. म्हणून सहज, साधारण नाम म्हणजेच भक्ती. ते नामस्मरण अंतःकरणाच्या तन्मयतेने झाले पाहीजे. नामाशिवाय मनुष्य जन्माची गोडी लागत नाही.

सत्भक्ती साठी सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी योग्य सद्गुरूंचा शोध केला पाहीजे. सद्गुरू कृपेवाचून देव दर्शन मिळणे कठीण आहे. तेंव्हा ही सत्भक्ती कोणत्या त-हेने करावी ?

ऋषीमुनिनी अनेक मार्ग सांगीतले आहेत. त्या त्या मार्गाने जावून त्यानी शांती सुखाचा अनुभव घेतला. व्यक्त सृष्टी मध्ये ज्या प्रमाणे तुफान व शांती, कोमलता व कठोरता, व्याकूळता व धन्यता वगैरे भाव आढळतात, त्याच प्रमाणे हृदय सृष्टी मध्येही आढळतात. शंका व कुशंकाचे वादळ-एखादे वेळेला शांत होईल, पण हृदयांतील कल्लोळ, सत्भक्ती शिवाय कधीही शांत होणार नाही. दूसरे असे की हल्ली हे यांत्रिक युग आहे. मानवानी नाना त-हेचे शोध लावलेले आहेत. पण तो फक्त बाह्य सृष्टीवर विजय आहे. भक्तीयुक्त अंतःकरणाने हृदयाचा ठाव घेणे, त्यांत प्रवेश करणे ही काही यांत्रिक युगाची शक्ती नाही. त्यासाठी ईश भक्तीचीच आवश्यकता आहे.
ईश्वराला जाणल्या नंतर कोठेही परक्याचे घर रहात नाही. या प्रमाणे ईश्वर चरणी विनम्र होण्याकरिता व जीवीतांचे साफल्य होण्याकरीता सद्गुरूना शरण जाणे हाच मार्ग उत्तम आहे. परमात्म्याच्या ज्योतीमध्ये आत्मज्योत मिळून जावी. ईश्वरैक्य व्हावे हेच ध्येय उत्तम आहे. त्यासाठी विषय वासनेचा त्याग केला पाहीजे.
मोहजाल दूर सारून षड्रिपूत न गुरफटता आपली काम्य कर्मातून सुटका करून घेतली पाहीजे आणि वर निवेदन केलेल्या चार तत्वांचे आतून आणि बाहेरून यथासांग पालन केले पाहीजे, तेव्हांच भूमी शुद्ध होवून अंतःकरणाचे ठायीं सत्भक्तीचा उदय होईल. भक्तीची अनेक अंगे आहेत. आपल्या मनाला वळण लावण्यासाठी शांती मिळण्यासाठी व ईश्वराजवळ जाण्यासाठी भगवंताची प्रार्थना करणे, भगवंताला आळवणे हे एक भक्तींचे अंग आहे.

प्रार्थना म्हणजे काय ?

तर परात्पर, क्षराक्षर, चराचर असे असणारे तत्व ! अर्थात असणारे व अनर्थातही असणारे व त्याच्याही पलीकडे उरलेले असे जे महान तत्व, ज्याचा अंत नाही, पाहिले तर सांगता येत नाही, धरता येत नाही, कवटाळता येत नाही, कडकडून भेटता येत नाही.

पण मानवाने सत्शुद्ध अंतःकरणाने त्याना आळवले, एकाग्र चित्ताने त्यांची प्रार्थना केली की तेच निराकारी तत्व सगूण रुप धारण करुन सत्भक्ताची ईच्छा पूर्ण करतात. त्यासाठी भगवंताची प्रार्थना कशी असावी? याचेच मार्गदर्शन आरतीच्या छोट्या पुस्तकांत केलेले आहे. त्याचा सेवेक-यांस अवश्य फायदा होईल. असे आम्हांस वाटते तरी सेवेक-यांनी याचा प्रत्यक्षांत अनुभव घ्यावा अशी विनंती.

You cannot copy content of this page