सेवेकऱ्याचे भोगत्व जोपर्यंत शिल्लक आहे, तोपर्यंत त्याला ते भोगत्व भोगू दिले जाते. माझ्या हातून काही चुक झाली नाही, असे म्हणणारा सेवेकरी किती महान असला पाहिजे? साधी चुक कबुल करण्यास केवढा अट्टाहास. सेवेकरी आपल्या कर्तव्यात आड मार्गानें जातात आणि भोगत्व भोगतात.
चुकीचे क्षमत्व आणि चुक, सेवेकऱ्याच्या मुखातून कबुल झाली पाहिजे. त्याशिवाय सदगुरु क्षमत्व नाही. सेवेकऱ्याकडून वरवर चुक, तर माऊली वरवर क्षमा करते. एक चूक लपविण्यासाठी दूसरी चुक करावी लागते. सद्गुरु दरबारमध्ये अखंड नाम असते, याचा महिमा ज्याला कळला, तोच ह्या दरबारचा सत् शिष्य होय.
नाम दिले. नामस्मरण चालू असता, मनाची चल बिचल अजूनही होत असते. कितीही कष्ट असो, तन–मन–धन तीनही चरणांवर अर्पण केल्यानंतर, त्या सेवेकऱ्याला कितीही कष्ट झाले तरीही ते सहन करण्याची ताकद लागते. सहनशक्ती निर्माण होण्यासाठी अशा तऱ्हेचे लाघव होत असते. आपण म्हणता ते बरोबर आहे. परंतु ते सत् शिष्य आहेत. त्यांचे, सत् ओळखण्यासाठी, षड्रिपू मारण्यासाठी आपल्या सत् शिष्याची परीक्षा घेण्यासाठी अशा तऱ्हेचे लाघव होत असते. सेवेकऱ्यां भोवती षड्रिपूंचे जाळे गुरफटलेले आहे. त्याचा एक एक धागा तोडण्यासाठी किती कष्ट लागतात हे त्या सेवेकऱ्यास कळावयास पाहिजे.
आपणास माहिती आहे, किती महान सत् पुरुष होऊन गेले. त्यांना किती कष्ट झाले? ते कशासाठी? लिनता, नम्रता, शालीनता येण्यासाठी हे करावे लागते. अशा तऱ्हेच्या लाघवातून पार पडून आणि षड्रिपू अधिन जो करतो, तोच त्याठिकाणी उतरू शकतो. महिमा जाण़ने आणि त्याप्रमाणे आचरण करणे फार निराळे आहे. सत् शिष्याच्या पाठीमागे सद्गुरु लाघव का करतात? त्याचे कारण इतकेच की, त्या सत् शिष्याला पूर्ण अधिन करावयाचा असतो. शालीनता, नम्रता व शांती निर्माण करावयाची असते. शांततेने आणि समाधानाने नामस्मरण झाल्यानंतर सदगुरू दूर नाहीत. हे ध्यानात ठेवावे. (समाप्त)©️