“विषय तो माझा झाला नारायण”
विषय हे पाच आहेत – बोल, स्पर्श, रूप, रस आणि गंध ! बोल या विषयामध्ये हरण हा मृत्यू पावला आहे. स्पर्श या विषयामध्ये हत्ती मृत्यू पावला आहे. रूप या विषयांमध्ये पतंग मृत्यू पावला आहे. रस या विषयांमध्ये मासा मृत्यू पावला आहे आणि गंध या विषयांमध्ये भ्रमर मृत्यू पावला आहे.
प्रत्येक ज्योतीच्या पाठीमागे हे पाचही विषय आहेत. या पाचही विषयांवर जो स्वार झाला, त्याची गती काय होत असेल? म्हणून मानवाला शांती, सुख, समाधान यांचा ठाव ठिकाणा लागत नाही. या विषयांवर स्वार झाल्यामुळे अशी अवहेलना होते. तरी अवहेलना न होता शांती, सुख, समाधान लाभेल अशा तऱ्हेने वाटचाल करावयास पाहिजे. या विषयापासून अलिप्त राहावयास पाहिजे.
पण हे इतर मानवांसाठी आहे. येथील सेवेकऱ्यांसाठी नाही. विषयाचा त्याग करून, आसनाधिस्तानी दिलेल्या मार्गावरुन वाटचाल केल्यानंतर कसलीही अडचण भासणार नाही. संकटे येणार नाहीत. येऊ देणार नाहीत.
पण या तत्त्वांचे आकलन करून वाटचाल करील तर या चौकटीत तो बसेल. मग तो वरील बाबतीत बोलू शकतो. त्याला जिकडे तिकडे सतच दिसते. सांगितल्याप्रमाणे वाटचाल करून, मनन करून सद्गुरु सानिध्यात वाटचाल करणे. अशी वाटचाल करीत मग वरील वाक्य शोभते. नाहीतर “बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात”.
पण येथील स्थिती जी आहे, ती म्हणजे, येथे प्रत्यक्ष कृती केली जाते आणि नंतर सांगितले जाते. दुसरीकडे अशी स्थिती नसते. येथे खूप असले तरी सांगणे मर्यादित असते. सेवेकऱ्यांनी विषयांपासून अलिप्त राहावे. (समाप्त)©️