३१) महामुनी इंद्रजाल – मालकांशी लबाडी केली. खोटे बोललो. जी वस्तू निषिद्ध ती खाण्यात आली.
३२) महामुनी जगदेश्वर – मालकांचे आदेश होते. प्रत्येकाला सत् मार्ग दाखविणे. असत कृती न करणे प्रत्येक गोष्ट सताशिवाय दिसता कामा नये. असे असताना एकाही ज्योतीला सताचे वळण दाखविले नाही. मी ही सत् मार्गाने गेलो नाही.
३३) महामुनी चक्रवर्ती – जे सत् कार्य करावयास सांगितले, ते असत्य केले आणि कार्य सत् केले असे समर्थांना खोटे सांगितले. समर्थांचे एक आणि माझ्या मनाचे एक असे समर्थांशी लपंडाव केले.
३४) महामुनी ऋषिक – शिस्तीचा भंग करण्यात आला. एवढेच नव्हे तर सेवेकऱ्यांत द्वेष भाव दाखविला.
३५) महामुनी चतोर – सेवेकरी सेवेकऱ्यांत द्वेष भावनेने वागत होतो. सर्व एकाच माऊलीची लेकरे असताना एकाचीच बाजू उचलून धरली.
३६) महामुनी परिक्षा – संसाराचा त्याग करून गेलो. अर्धांगी व दोन मुलें – एक आठ वर्षांचा व एक चार वर्षांचा. त्यांच्या संरक्षणाची कोणतीच तजवीज केली नाही. पिताजी पाठीमागे होते. त्यावेळी हे कळले नाही.
३७) मुनीवर्य पद्मेश्वर – सर्व सेवेकऱ्यांना एक मार्ग दाखविण्यात आला नाही. एकाला एक आणि एकाला एक असे केले. त्यावेळी मी आसनाधिस्त होतो.
३८) महामुनी मधुकर – मायावी कर्तव्याला आदेश नसताना स्वतःच्या मनाने कार्य करीत होतो.
३९) महामुनी कौशिक – जरी महान तप:श्चर्या असली तरी त्याचा काय उपयोग आहे? प्रत्यक्ष मालकांचे आदेश धुडकावण्यात आलेत. त्यांची महती जाणली नाही. म्हणून ही स्थिती अनुभवयास मिळाली. सत् मार्गाने जाण्याचे आदेश होते, ते पाळले नाहीत. सेवेकऱ्यांत द्वेष भाव दाखवायचा नसताना द्वेष भाव दाखविला.
४०) महामुनी दुलारी – मालकांचे संदेश धुडकावले. मला एक गुणधर्म जडला होता की याची लावा-लावी कर, त्याची लावा-लावी कर. याला चढव, त्याला पाड. ही तऱ्हा करून मजा पाहत असे. ही महान अघोरी चूक माझ्या हातून झाली आहे.
४१) महामुनी दमकेश्वर – दरबारातील शिस्तीचा भंग करून, मनाला वाटेल त्या तऱ्हेने दरबारात गोंधळ घातला.
४२) महामुनी एकनाथ – मालकांचे आदेश न ऐकता, मन मानेल त्या प्रमाणे वागलो. आदेशाची महती न बाळगता धुडकावण्यात आले. मानव देहांत असताना एक प्रकारची गुर्मी असते. अहंपणा असतो. माझे कोण काय करणार आहे? पुढचे पुढे पाहता येईल, असे वाटत होते. परंतु, स्थूलातून बाहेर पडल्यानंतर सर्वस्व कळून आले.
४३) महामुनी गोविंद – दरबारात असताना गुरुबंधूंशी प्रेमाने वागणूक झाली नाही. थट्टा, मस्करी केली. मीच शहाणा अशा तऱ्हेने वागलो. (4) (समाप्त)©️