कालचेच उदाहरण घ्या, “एका दरबारात दिलेले प्रणव, दुसऱ्या दरबारात फिरवितो.” हे दोघांचे चाललेले होते. दोघेही सताचे सेवेकरी. एका कपात चहा पिणारे. पण दोघेही एकमेकांच्या डोक्यावर ठेवतात. यांना शांती कुठून द्यावयाची? पण धनासाठी लबाडी करणारे, यांना कधी शांती मिळेल कां?
आपण शांततेने झोप घेता, पण धनवानाला शांत तऱ्हेने झोप येत नाही. ती अघोर माणसे समजा. त्यांना पैसा पाहिजे. ते भावाला भाऊ म्हणत नाहीत. ते म्हणतात, हा व्यवहार आहे. धनामुळे लाख भानगडी वाढतात.
ज्याने कनक आणि कांता सांभाळली, तो परम गतीला जातो. धनामुळे बुद्धी भ्रष्ट होते. पण जो नितीयुक्त गतीने जात असतो त्याला काही कमी पडणार नाही. पण धनवानाला भीती आहे. कोणी चोरून नेले तर? स्वतःच्या बायकोला सुद्धा तो कळू देत नाही.
समर्थ सांगतात, “स्थुलातून बाहेर पडताना माझ्या ध्यानात राहा. मग मन धनावर जाणार नाही.” जो धनाचा लोभी नसतो, त्याला फिकीर नसते. तो धनाचा आशक नसतो. हे सर्वस्वी ब्रह्म आहे, अशी त्याची धारणा असते. तेव्हा मनाची चाकोरी स्थिर ठेवणे, अशा तऱ्हेने मनाची गती स्थिर शुद्ध ठेवली तर दृश्याला दृश्याची आवश्यकता आहे. त्यात कोणता लाभ मिळतो तर तो अनंत काळ टिकणारा लाभ असतो. तो भक्तीचा लाभ आहे. त्याने त्याला परम पद मिळते.
पण तनाचा आणि धनाचा लोभी झाला तर परम पदापासून दुरावला जातो. म्हणून ही जी तीन अंगे आहेत, यातून चकता कामा नये. या सत् शुद्ध गतीने, नीतियुक्त तऱ्हेने वाटचाल केल्यास परम पद दूर नाही. तेव्हा व्यवहाराची गती शुद्ध ठेवून उघड्या डोळ्यांनी वाटचाल करा. डोळे उघडे ठेवून व्यवहार करा. हे सर्वस्व लय होणार आहे. स्थूल अव्यक्त झाले म्हणजे सूक्ष्म प्रगट होते. यामुळे त्याला सर्वस्वाची गती मिळते. याप्रमाणे गती देत देत समर्थ म्हणतात, “पहा मी कसा आहे.” पण हे पाहणारे प्रकाशमान सेवेकरी सुद्धा चकतात. याला कारण मोह, माया आणि धन ! (५)©️