Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – स्थूल जडत्वाला काय होईल आणि काय नाही याचा नेम नाही. जडत्वाला व्याप झाले तर मानव कासावीस होतो आणि …

अघोर मनाच्या आधीन बनल्यानंतर, तो मनाच्या आधीन होतो, मग त्याच्याकडून त्याच्याच मनाप्रमाणे कर्तव्य करून घेतो. असे करताना तोच खड्ड्यात पडतो. त्यातून वर …

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – स्थूल जडत्वाला काय होईल आणि काय नाही याचा नेम नाही. जडत्वाला व्याप झाले तर मानव कासावीस होतो आणि …

अघोर मनाच्या आधीन बनल्यानंतर, तो मनाच्या आधीन होतो, मग त्याच्याकडून त्याच्याच मनाप्रमाणे कर्तव्य करून घेतो. असे करताना तोच खड्ड्यात पडतो. त्यातून वर …

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

अखंड सेवा – ©️

अखंड सेवा – ©️

श्री समर्थ मालिक – अखंड सेवा हि दिलेलीच असते. परत मागण्याची जरुरी नसते. ती दिलेली असते. सेवेकऱ्यांना ती टिकविता येत नाही, म्हणून त्यांना असे वाटते आणि जरी नसेल, तरी मालिक, सद्गुरु हे देतातच. दिलेल्या प्रमाणे सेवेकऱ्याने ती सेवा टिकविली पाहिजे. अखंड सेवा दिली आहे, पण त्या अखंडत्वाचा उपभोग घेता आला पाहिजे. ज्याला कधीही खंड नाही, असे ते अखंड सेवेकऱ्याला दिलेलेच असते. त्या सेवेत खंड आहे का? भक्ती करणे हा मानवाचा हक्क आहे, अधिकार आहे. तो कुणीही हिरावून घेत नाही. घेतला जाणार नाही. पण भक्ती म्हणजे काय? हे अजून काही मानवांना समजले नाही. काही मानव हे अद्वैताच्या मागे आहेत. काही द्वैताच्या मागे आहेत, त्यांना सत मार्ग सापडणार नाही.

आपल्याला जे अखंड भक्तीचे वळण दिले आहे, ते सत् आहे. तेच अद्वैत आहे. तिच अखंड सेवा आहे. तिच सत् तिजोरी आहे. सेवेकऱ्यांनी त्याचा उजाळा करणे. ती तिजोरी कधी काठोकाठ भरेल, याचीच सेवेकर्‍यांनी अपेक्षा करणे. ती नामाने अखंड भरली म्हणजे सर्व ठिकाणी प्रकाश फाकेल. मग कोणत्याही बाबतीत सेवेकऱ्यांना न्यूनता भासणार नाही. पण, तितकी तयारी झाली पाहिजे. पूर्वीच्या युगात महान महान सेवेकरी होते. ते अखंड सेवेत, गतीत निमग्न झाले, सेवामय झाले, भक्तीमय झाले. त्याप्रमाणे आताच्या युगात कोणी दिसत नाही. आहे कोणी असा की ज्याची तिजोरी भरून वाहत चालली आहे? अखंड असे सत्पुरुष आहेत का? पण ते ऋद्धी सिद्धीच्या पाठीमागे आहेत. ते मानवांना चमत्कार दाखविण्यासाठी, नावाला हपापलेले असतात. (पुढे सुरु…..२)©️

You cannot copy content of this page