|| सुस्वागतम् ||
आज आम्हांला आपल्या श्री सद्गुरू माऊलींच्या नामाभिधानाचे हे संकेतस्थळ आपणासमोर सादर करतांना अत्यानंद होत आहे.
आजपासून आपण जागतिक स्तरावर आंतरजालामार्फत एकमेकांच्या संपर्कात येऊन माऊलींनी घालून दिलेली त्यांची आध्यात्मिक परंपरा त्यांच्याच कृपार्शिवादाने पुढे नेण्याच्या प्रयत्नांत आहोत.
आपल्या श्री सद्गुरू माऊलींनी चाळीतील एका खोलीतील बीजारोपणापासून आपल्या या आध्यात्मिक कार्याचा शुभारंभ केला होता, त्याचे आज वटवृक्षात रुपांतर होऊन, त्या सत्संग कार्याच्या शाखा त्यांच्या सेवेक-यांच्या रूपात जगभर पसरलेल्या दिसून येत आहेत.
ज्या जगत् नियंत्याने हे सारे जग निर्माण केले, ते विश्वस्वरूपी ॐ कार, जगत् चालक, जगत् पालक ही सर्वस्वांची आध्यात्मिक प्रगती पाहून निश्चितच आनंदीत झालेले असून, उत्तरोत्तर अशीच आपल्या समस्तांची प्रगती होण्यासाठी आपल्या कृपार्शिवादाची सर्वांवर बरसात करीत आहेत. तो मायेचा वर्षाव आपण झेलून त्यांचा हा वारसा अखंडीतपणे पुढे नेवूया………….
परस्त्री मातेसमान मानने
परधन आपले नव्हें ह्याची जाण ठेवणे
मिथ्य भाषा वर्ज्य करने
मादक व नशिले पदार्थ सेवन वर्ज्य
सत् भक्तीचा प्रकाश
आपल्या भारत भूमीमध्ये प्रत्यक्षात भगवंताने अनेक अवतार नटवून त्याला पुनीत केलेले आहे. असा हा महान पवित्र व मंगलमय देश आहे. याच भारत भूमीमध्ये अनेक ऋषी, मुनी व तत्वज्ञानी जन्माला आले. सर्व विद्येमध्ये पारंगत असे ज्ञानी, साधू, संत, आचार्य महंत, याच भारत भूमी मध्ये निर्माण झाले.
प्रवास...सगुणाकडून निर्गुणाकडे !
श्री सद्गुरू दरबार व आश्रमांची स्थापना जवळजवळ 75 वर्षांपूर्वी आपल्या श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांनी मुंबई येथे केली. मूळ कोकणातील कुडाळ तालुक्यातील वालावल क्षेत्री श्री सद्गुरु माऊली भगवान महाराज यांचा जन्म झाला. श्री सद्गुरु माऊलींचे पूर्ण नाव श्री भगवान नारायण (चौधरी) पोखरे होते.
आंतरजालीय देणगी (सेवा)
आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, समस्त भक्तगणांच्या सोयीसाठी विश्वस्त संस्थेतर्फे ऑनलाईन रिसीट सॉफ्टवेअर (आंतरजालीय पावती मिळणारी) पद्धत अनुसरण्यात येत आहे. त्याद्वारे आपणास आपल्या सेवेची रिसीट आपल्या इमेल आयडीवर व एस् एम एस वर ताबडतोब मिळणार आहे.