पुण्यस्मरण दिन कार्यक्रम – मुळाश्रम
(१) श्री सद्गुरु माऊली पूजा सकाळी ०९:०० पासून सुरू होऊन
(२) श्री सद्गुरु माऊलींचे नामस्मरणाने व
(३) सकाळी ११:०० वा. नंतर ॐ कार उच्चारण तथा श्री सद्गुरु माऊलींचे नामस्मरण (सामुदायिकरित्या) तसेच
(४) श्री ११:१५ गुरु गीता पठण (सामुदायिकरित्या) करण्यात येऊन
(५) श्री सद्गुरु माऊलींच्या आरतींनी – (अ) जयनाथ सद्गुरु तू तें ! आरती क्रमांक पाच (५) (ब) धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायांची ! आरती क्रमांक सात (७) (क) ॐ कार स्वरूपा सद्गुरु समर्था ! या ॐ कार स्तूतीने (ड) ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ! (इ) सदा सर्वदा योग तुझा घडावा ! या आरती संग्रहातील आरतींनी संपन्न झाला.
(६) आरती संपन्न झाल्यानंतर अवधीतच श्री माऊलींना प्रसाद अर्पण……तद्नंतर भक्त परिवारामध्ये प्रसाद ग्रहण हा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
एकंदरीत पाहता, ह्या कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर पासून अवकाळी पावसाने हजेरी लावून सर्वत्र मैदानात पाणीच पाणी केलेले असतांना व सर्वत्र चिखल झालेला असताना देखील कार्यक्रम कसा पार पडणार हि काळजी समस्त भक्त गणांना होती, ती सद्गुरु माऊलींनी दूर केली.
आजचा हा कार्यक्रम विना अडीअडचणींचा होऊन श्री सद्गुरु माऊली कृपेकरून अत्यंत शांततेने पार पडला व संपन्न झाला. हा कार्यक्रम श्री सद्गुरु माऊलींच्या वालावल आश्रम व सातारच्या आश्रमात देखील श्री सद्गुरु माऊलींच्या नामघोषाने आनंदीमय स्थितीने भजन, किर्तन, नामस्मरण करुन श्री सद्गुरु माऊलींना प्रसाद अर्पण व ग्रहण करून संपन्न झाला.
येथे आपल्या अवलोकनार्थ चित्रफितीची लिंक दिलेली आहे – https://youtu.be/LGNH1GIFVss?si=Upm-l–SA6mEIrdv