संतांनी स्वतःचा अनुभव सांगितला. जो भक्तित रममाण झाला, त्याला लबाड, दुश्मन, चांडाळ दिसत नाही. पापपुण्य समजत नाही. तो एकातच रममाण झालेला असतो. ते संत, रात्रंदिवस सद्गुरु ध्यानात निमग्न झाले होते. पण प्रकृतीचा तरी अंत लागलेला आहे का? प्रकृतीत कोण वास करतो, हे कोणी पाहिले आहे का? अघोर मानव अघोर भक्तिने जातो, त्याला नमस्कार चमत्कार पाहायला मिळतात, तो सतापर्यंत येऊ शकत नाही, कारण इंद्रियाना वळण सत् पाहिजे. मग वागणूक कशी ठेवली पाहिजे? सत् भक्ताचे कर्तव्य कोणते आहे? तेव्हा निष्कारण वेळ घालविण्यापेक्षा अखंड तिजोरीत रममाण झालात, तर मग प्रकाश लांब आहे का? कोणालाही अप्रकाशित ठेवलेले नाही. पण वाचाळता जास्त असली तर प्रकाश कुठे आणि काय? ते सापडत नाही.
तुकोबांने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले, ते सर्वांकरिता म्हटलेले आहे. त्यांना ते दिसत होते, पण इतर ज्योतीना त्याचा अनुभव नव्हता. त्यांचा भाव निराळा नव्हता. ©️