श्री समर्थ मालिक एकचित्त – कुंभाने जे सांगितले, ते हे अघोर पद नव्हे कि, प्रणव टाकल्या टाकल्या एखाद्या मानवाला प्रकृतीवर विकृत करणी करून तो झटतो, ते हे तत्त्व नाही. हे मी केव्हाही करणार नाही. असे करू शकणार नाही.
हे तत्व फार न्यारे आहे. माझा अंत कोणीही घेणार नाही. माझा अंत सापडणे दुरापास्त आहे. मी अघोराला वाईट म्हणणार नाही व सतालाही वाईट म्हणणार नाही. कार्य करून कसे घ्यायचे, हे माझ्या प्रत आहे. कर्तव्य करावयाचे त्यांनी कर्तव्य करीत राहणे. त्याचे फळ अखंड हे देणारच! ज्याची कृती सत त्याला सत् फळ मिळते. ज्याची कृती असत त्याला पुढचा मार्ग कसा करावा, त्याच्याकडून ती कृती कशी घडेल, हा विचार करतो. जितकी अनिती घडेल, तितके सोपे जाते. मग त्याला दूर लोटायला वेळ नाही. तो आपोआप दूर लोटला जातो. पण सेवेकर्यांनी थोडीशी कळ सोसली पाहिजे.
कर्तव्य कोणाकडून करून घेईन आणि कोणाकडून नाही, हे सांगता येत नाही. जी घडण घडते, ती चांगल्यासाठीच घडते. थोडेसे कष्ट आहेत, त्याचे फळ आज ना उद्या मिळतेच! शुद्धीकरण झाल्यानंतर सर्वस्व व्यवस्थित होईल. पूर्वीसारखा कस आताच्या सेवेकऱ्याला नाही. ज्या सेवेकऱ्याला कसून घ्यावयाचे आहे, त्याला कसून घेणारच!
पूर्वीच्या कर्मसंचिताप्रमाणे ज्या ज्योती ठाम आहेत, श्रद्धायुक्त आहेत, त्याना मी जाऊ देणार नाही. जो मानव मनाच्या आधिन झाला, मन पवनाच्या घोड्यावर आरुढ झाला, त्याला काय करावे, याची गती मला चांगली आहे. अशांना स्थिरता मिळणार नाही. त्रास झाल्याशिवाय घर्षण होत नाही. आग चेतत नाही. (समाप्त) ©️