महामुनी कुंभ – अकार, उकार, मकार हे रज, तम, सत्व आणि याला जोडून ७२ नाड्या. ७२ च्या ठिकाणी ३६ कोटी गण. यावर आरुढ झालेले स्वयमेव तत्व ! हे काय करील व करून घेईल याचा अंत नाही. तेच कर्तव्य करून घेत आहेत. मी काही करत नाही, फक्त कर्तव्य करून घेतो असे म्हणणे आहे ते सत्य आहे. तेच तत्त्व कर्तव्य करून घेत असते. त्याला ज्याने बोट लावले, त्यांनीच लावले. इतरांना लावता येणार नाही. धरायला गेल्यास सापडणार नाही. क्षणात स्थूल रूप धारण करण्याची व क्षणात लय होण्याची शक्ती आहे. हे काही सांगता येत नाही, म्हणून यांच्या सानिध्यात एक यत्किंचित सेवेकरी काय करणार आहे?
तपश्चर्येची कोणी गणती केली? समर्थांनी आपल्या नादात गुंग करून घेतले. त्याला कसली वर्षे आलीत? म्हणूनच त्या महान तत्वाने अशा तऱ्हेने काळ लोटीत नेला आहे. त्या समर्थांसारखे दयाघन तत्व दुसरे नाही. ते स्वयमेव तत्व आहे. त्यांनीच सर्वांना निर्माण केले आहे. त्यांना कोणी निर्माण केले नाही.
या तत्त्वात रममाण होण्यासाठी, या मार्गाने जाणाऱ्या ज्योती क्वचितच असतात. समर्थांना श्रद्धायुक्त ज्योती पाहिजेत. श्रद्धा डळमळीत असली तर या मार्गात तो टिकू शकणार नाही. काहीही होवो, श्रद्धा ढळू देता कामाची नाही. हे स्वयमेव तत्व आहे. याचा वास आपल्या अंत:र्यामी आहे.
३३ कोटी दैवते आपल्यातच आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे आपल्यातच आहेत. ३६ कोटी गण तुमच्या हृदयात आहेत. यावर आरुढ हे स्वयमेव तत्व आहे. तेच सर्वस्वाचा कारभार हाकतात. या दरबारात यावर उहापोह झाला आहे. यावर सेवेकऱ्यांनी विचारपूर्वक या ठिकाणी श्रद्धायुक्त भावनेने सत् कर्तव्य करीत राहणे. ©️