Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

गुरुतत्त्व आणि सेवेकरी ©️

गुरुतत्त्व आणि सेवेकरी ©️

गुरुतत्त्व आणि सेवेकरी हे लागेबांधे फार वेगळ्या तर्‍हेचे आहेत. ज्याने ओळखले तो धन्य होय.

सेवा आणि सेवेकरी म्हणजे काय? ती कशी करावयाची? याचे निवेदन झाले आहे. सेवेकरी आपल्या सद्गुरुंना देऊन देऊन काय देणार आहे? सद्गुरुंनी काय अपेक्षा केली? तेव्हा गुरुतत्त्व हे असे आहे.‌ त्याचा अंत:पार नाही. त्यांच्या मुखातला एक कण जरी झेलला, तरी तो सेवेकरी भाग्यवान आहे.

गुरुतत्त्व आणि सत् सेवेकरी यांचे महत्त्व पुराण काळापासून या भारतात आहे. त्याचे एक उदाहरण देत आहे – द्रोणाचार्य सत् पदाचे ऋषीमुनी होऊन गेले. आजच्या शुभदिनी पांडव प्रताप लिहीला, त्यातील हे एक छोटेसे उदाहरण आहे. द्रोणाचार्य हे गुरु होते. त्यांच्याजवळ अनेक शिष्य विद्याभ्यासासाठी आले होते. त्यात एक सेवेकरी चुकला होता. आपणाला जाणीव आहे, हे उदाहरण का देत आहे? प्रत्यक्ष गुरुमुखातून त्याला संज्ञा दिलेली नव्हती, पण त्याने गुरुतत्त्वाची एक प्रतिमा ठेवून विद्या प्राप्त केली. याप्रमाणे गुरुतत्त्वास सदैव जागृत राहिले, तरच तो अखंड सेवेकरी होय. कामापुरता सेवेकरी असे नको. या आसनाचा सेवेकरी आतून बाहेरून सद्गुरुमय व्हावयास पाहिजे. त्याने प्रतिमा जागृत केली. त्याच्यात अचाट गुरुभक्ती निर्माण झाली आणि तो एक आदर्श सेवेकरी झाला. त्याप्रमाणे आपण व्हावयास पाहिजे. ©️

You cannot copy content of this page