श्री समर्थ मालिक –तिर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी || ज्या वेळेला तुकोबांनी हे बोल फेकले त्या वेळेला त्यांनी किती तीर्थे केली होती? काशी, गया, प्रयाग वगैरे त्यांनी तीर्थे केली का? मग तीर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी || आधीच मन मुंडा | मगच ब्रह्म धुंडा || ज्याने मन मुंडा केले नाही, त्याला ब्रह्म कळेल का? कोणत्या सेवेकऱ्यांने मन मुंडा केले आहे?
तुकोबांनी एकाच ठिकाणी ब्रह्म पाहिले. डोळस झाल्यानंतर त्यांना तीर्थ कोठे आहे ते कळले. मानव हा सगुणी आहे. सत शुद्ध अंतकरणाने सद्गुरू चरणात निमग्न झाला मग परमेश्वर दूर आहे का? सर्व तीर्थे जर सद्गुरूंच्या ठिकाणी आहेत मग सद्गुरुंनी जे संदेश सोडले त्याप्रमाणे तुम्ही वागता का? मला याचे उत्तर द्या.
आसनावरून जे प्रणव सुटतात त्याची गुप्तता ठेवली आहे का? भिंतीला कान असतात. तुम्हाला काय त्याचे? समर्थांना काही कळले नाही. प्रवचन मी सांगतो आणि तुम्ही “नळी फुंकीली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे”. त्याची जोपासना कोणी मीच करावयाची?
तुकोबाने जे सांगितले ते कोणत्या तीर्थाच्या ठिकाणी ते गेले? तुकोबा असेच होते का? पण तुकोबांची काही लोकांनी वेड्यात गणना केली होती. पण त्यांचे प्रणव, बोल, विचार कसे होते? मग तुम्ही ज्यांना शरण आहात, त्यांच्या प्रणवाप्रमाणे, आदेशाप्रमाणे तुम्ही चालता का? मानवी तऱ्हेने त्यांनी जे प्रणव सांगितले, त्याची तरी गुप्तता तुम्ही ठेवली आहे का? एकाने स्पष्टीकरण करावयाचे, एकाने ठाम विचारावयाचे. (समाप्त) ©️