चार दिशेला चार दरबार आहेत. दक्षिण, उत्तर व पूर्वेला एक एक दरबार आहे. उत्तरेच्या बाजूला जो दरबार आहे, त्याची गोपाल स्वामी नाम घेऊन स्थापना झाली.
वेषांतर - जठाधारी - अशा प्रकारचे आहे. पूर्वेच्या बाजूला जो दरबार आहे, त्या दरबारात आतापर्यंत तीन तऱ्हेची कार्ये होत आली. त्यात तीन…
हा दरबार दैवतांचा किंवा व्यक्तींचा दरबार नाही. अनंत काळापासून चालत आलेला हा दरबार आहे. या चार दरबारांची स्थापना अनंत काळाची आहे. त्या पैकीच हा एक दरबार आहे.
जो ज्या तऱ्हेने पाहतो त्याप्रमाणे त्याला त्याची ओळख होते. याची शोभा अनंत काळापासूनची आहे. आता कार्य करण्यासाठीं अवतार कार्य सुरू…
मानव हा मायेत गुरफटलेला आहे. त्यातून सुटका कशी होईल हे समजण्यासाठीच या दरबारची निर्मिती आहे.
चार दिशेला चार दरबार आहेत. अशा तऱ्हेचा उत्सव अनेक ठिकाणी आज होत आहे. परंतु हा स्वयं दरबार आहे. या ठिकाणी एक क्षण का होईना, प्रयत्न करने हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. आज या ठिकाणी अखंड तत्व प्रगट आहे. ते प्रगट…
मनुष्य हा प्राणी श्रेष्ठ मानला जातो. त्याने श्रुति, स्मृती, अनुभव ह्या तिन्हीचा त्रिवेणी संगम आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने करणे आवश्यक आहे. या ठिकाणी सत् चित् आनंद एक क्षण का होईना, प्रकृतीच्या दृष्टीने का होईना, लुटण्यास मिळतो.
आपले कर्तव्य कोणते? कोठे गेल्याने परम निधान तत्व प्राप्त होईल? सत् स्वरूप,…
मानवाने सदिच्छा, सत् भावना, सत् संग या योगानें आपले कार्य भूतलावर करीत राहावे. सत् शिष्य सद्गुरूला तन, मन, धन अर्पण करून शरण जातो आणि अमूल्य असा ठेवा त्याजजवळ शिल्लक राहतो. हा अमूल्य ठेवा म्हणजेच सद्गुरु ठेवा होय.
सत् शिष्य हा सद्गुरुंचा दास, सद्गुरु सत् शिष्यांचे दास. असे…
सेवेकरी ऐकत नाहीत, म्हणून असे सांगावे लागते. दोन्ही सारखीच आहेत. असे सांगण्याचे कारण, या भीतीने तरी, त्यांनी चांगले वागावे. ज्यावेळी आपण सातारला गेला होता, त्याप्रमाणे स्थिती ठेवणे.
दरबारची वेळ ४ ते ८ दरम्यान राहिल. त्यावेळेला याच ठिकाणी ते खडे राहतील. नियमाप्रमाणे वागा व कृती करा. याने मालकांना आनंद होईल. आनंदाच्या भरात आदेश सुटतील. इच्छेप्रमाणे प्रवचन…
सद्गुरु चरणांचा अंत घेतल्यावर मुक्ती शोधण्यासाठी कोठेही जावे लागत नाही. सद्गुरु चरणात लीन झाल्यानंतर तो ब्रह्ममय आनंद मिळतो त्याचे वर्णन करता येणे शक्यच नाही. त्या सद्गुरु चरणांचा आशिर्वाद प्रत्येकाने घ्यावयास पाहिजे. स्वानुभव घेतल्या खेरीज ते कसे आहेत ह्याची जाणीव होणार नाही. त्या अनुभव प्राप्तीसाठी सद्गुरु चरणात लीन होणे हेच मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
सद्गुरु शोधण्यासाठी…
सद्गुरु हेच तत्व, मी कोण आहे, याची जाणीव करून देऊ शकतील. सद्गुरु पद हेच सर्व श्रेष्ठ आहे. याच्या पलीकडे काहीं नाही.
आतापर्यंत जे झाले, ते सद्गुरु माऊलीच्या कृपेनेच झाले. त्या गुरू माऊलीच्या कृपे शिवाय काहीच करता येत नाही. मी काय सांगतो याचे मुळीच भान नाही. बोलविता धनी वेगळाच आहे. कोण बोलतो याची जाणीव रहात नाही.…
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ! म्हणून रात्रभर एखाद्या देवळात भजन म्हणणे, टाळ कुटणे, जागरण करणे अशाने ईश्वर मिळत नाही.
सद्गुरु नामस्मरणात आणि दर्शनात शांत चित्ताने, त्याच तत्वात लय होवून, मी कोणीही नाही, करणारे, करविणारे, करायला लावणारे सद्गुरूच आहेत असे म्हटले, म्हणजे त्या दयाघन माऊलीला काळजी पडते. त्या व्यतिरिक्त चारही देहाचा उद्धार होणे…
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ! तेणे मुक्ती चारी साधियेल्या !!
मानवाला चार अंगे आहेत - स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण ! या चारही देहातून तो उद्धार करू शकतो. केव्हा? तर ज्या ठिकाणी शरण जायचे, त्या ठिकाणी तो पूर्णत्व शुद्ध पाहिजे. द्वैत भावना, संशय, कल्पनारहित जो असेल तोच सत् पाहू शकेल, इतरांस…
श्री समर्थ रामदास स्वामी -
हरिहर ब्रह्मादिक | नाश पावती सकळीक ||
सर्वदा अविनाशी एक | सद्गुरु पद ||
ह्या परम श्रेष्ठ पदाचा महिमा माझ्या सारख्या यत् किंचित पामराने कोठवर वर्णन करावा? अविनाशी पद काय आहे? त्याचा कधीही विनाश होत नाही. कोणी करणारा नाही. करविता नाही. केलेला नाही. अशा परम पदाचा महिमा माझ्या सारख्या…