साक्षात मानव प्राणी येथपर्यंत (कैलासापर्यंत) येऊ शकत नाहीत.
महाशिवरात्र म्हणजे काय? शिव कोण?
स्वयंभू - आमच्या पेक्षाही शिव फार निराळा आहे. त्यांच्याच ध्यानात मी नेहमी निमग्न असतो. मी जर शिव असतो, तर येथे आसन टाकून बसण्याची जरूरी नाही. खरा शिव फार वेगळा आहे. आम्हीं त्यांच्याच आधीन आहोत. देव दानव सर्व त्यांच्याच आधीन आहेत. ते…
आपले कार्य अजून पुष्कळ पडलेले आहे. ते कार्य नको का करायला? मग असे करून कसे चालेल? याच्या पेक्षाही महान कार्ये दरबारात येणार आहेत. आता उघड करण्याचे काही कारण नाही. त्या कार्याकरिता या सेवेकऱ्याना कसून घेतलें पाहिजे. जर आता कसून घेतले नाही, तर याच गतीने वाटचाल करून पुढचे कार्य अपुरे राहील. अशा रीतीने सेवेकऱ्यानी कार्ये केली…
त्यांची अर्धांगिनी आली होती. जाणीव घेतली होती ना? ती दर्शना करता आली होती. जर या शक्तीला पाहू शकला नाहीत, तर पुढें वाटचाल कशी करणार? ही शक्ती दर्शना करता आली होती. काही त्यांचे उपासक आले आहेत. परंतु ह्या दरबारात कोणाचे काहीच चालणार नाही. त्यांना वाटत असेल की, हा दरबार मामुली आहे, ऋद्धीं सिध्दी आहेत, चमत्कार नमस्कार…
बाबा, मालकांना विचारणा करतांना म्हणतात, "आमच्याही पेक्षा खरा शिव न्यारा आहे. ते कसे? आम्हाला थोडेसे सांगा !
समर्थ म्हणतात, "स्वयंभूला निर्माण करणारा कोणीतरी आहे. स्वयंभू हे भोळे आहेत. त्यांची कोणी भक्ती केली किंवा काहीं विचारलं सवरलं म्हणजे ते झटदिशी वचन देतात. त्यांना मागचा पुढचा विचार नाही. ते नेहमी ध्यानस्थ बसलेलें असतात. त्याला मानव तप या…
आपल्या दरबारात मायावी ज्योती येतात. आपण म्हणतो की, कर्मसंचित दूर ढकला. तसे नाही. एवढ्या योनीत ढकलले तर, ते आणि हे असे द्वय कर्मसंचित भोगावे लागते. आपले सेवेकरी आजारी असतात. ते कर्मसंचित पुढे ढकलता येणार नाही. पुढे ढकलले तर द्वय संचित भोगावे लागेल. यापेक्षा जे आहे ते तू भोग. जर दूर करावयाचे असेल, तर अखंड नामात…
आपला मार्ग कोणता? नाम कोणी दिले? कोणाच्या नामात दंग? ते सद्गुरू कोणते? याची पाहणी करण्याकरीता त्यांच्यात दंग असावयास पाहिजे. मालिक जाणीव देतात. पण सेवेकरी ऐकत नाही.
मालिक सांगतात ते हिताचेच सांगतात, मग सेवेकऱ्याने असे कां करावे? माया सर्वांना आहे. ज्याच्या पाठीशी अखंड तत्व, त्याला माया काय करणार आहे? ज्याच्या पाठीशी (ते) नाहीत, त्याला माया कबजा…
अलख –
ज्ञानाची मूर्ती म्हणजे कोणती मूर्ती? कोणते नांव? असा अविनाशी आत्मा म्हणजे स्वयम् प्रकाश! त्यालाच पाहिले पाहिजे!
आपल्या शरीर रुपी पिंजऱ्यात कसे आरुढ आहेत याची जाणीव सेवेकऱ्यांनी घ्यावयास पाहिजे. जाणीव घेतल्यानंतर याच मार्गाने ज्योत गेल्यानंतर, पायरीने मग ते मालिक कसे आहेत, त्यांना आकार आहे कां? ते कोणत्या तऱ्हेने सांगतील.
मालिक प्रगट करुन सांगतात. पण…
विठ्ठल - भक्तीचे मुळ म्हणजे काय? व कसे?
प्रथम कोणतीतरी एक वस्तू आपण नजरेसमोर आणतो आणि ती वस्तू सत् कृतीने पुजतो. त्या वस्तूवर भावना असावी लागते. आता ह्या सत् कृतीची जाणीव कशापासून होईल? तर एकच ! प्रथम सद्गुरुना शरण जायला हवे. मग ती वस्तू सर्व जगात सर्व ठिकाणी वावरते याची परिपूर्ण जाणीव होईल.
आता ती…
सेवेकरी ज्यावेळेला शरण जातो, तो कोणाला शरण जातो? जे त्रिभुवन व्याप्त असून, अलिप्त आहेत, तेच आसनाधिस्त असून, त्यांनाच सेवेकरी शरण जातो. तेच ठिकाण परम शांतीचे माहेरघर, परमधाम, आश्रयस्थान, सर्व सुखांचे परमोच्च निदान आणि त्याच ठिकाणी शांतीही अखंड नांदत असते. तेच मोक्षाचे ठिकाण होय. तोच मोक्ष होय.
मग आसनाधिस्तानी सांगितल्याप्रमाणे वाटचाल करीत करीत मन एकदम…
Mulashram
ध्यास मनी, ध्यास जणी.....
घेतला वसा, टाकू कसा?
भाळी उमटवू सद्गुरु चरणांचा ठसा.....
अखिल श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन त्यांच्या समस्त भक्तगणांनी
मनी धरुनी आस,
करुया म्हणाले खास,
याचे आले प्रत्यंतर आम्हांस,
…
ज्या समर्थांनी जे तत्व सर्वांठायी विखुरलेले आहे, सर्वांठायी व्याप्त करुन ठेवलेले आहे, फेकले आहे ते नसल्यावर तू कोणाची भक्ती करणार? आणि कशी करशील? मग मी भक्ती करतो ह्याला आधार काय? कसे म्हणशील? तर सत् मार्गाला लावणारी, बुध्दीला चेतना देणारी, प्रकृतीला चेतना देणारी, सर्वस्वाला चेतना देणारी व्यक्ती एकच आणि तीच सर्व ठिकाणी व्यापक होय. ती जर…
अद्वैत भक्ती म्हणजे काय? व ती कशी करावी?
भक्ती करतो म्हणून ती होत नसते. करावयाची आहे म्हणूनही ती होत नाही. भक्ती करुन घेणारा व करणारा हा एकच असतो. तो शुद्ध स्फटिकासारखा भावना रहित असतो, कल्पना रहित, संशय रहित असतो. म्हणजे काहीच कल्पना नसते. यालाच म्हणतात अद्वैत भक्ती !…