हे सर्वस्व तुमच्या कृतीच्या आधीन आहे. पण याच्या उलट, दृश्य धन लाभल्यावर त्याला इतरांची किंमत वाटत नाही. ओळख रहात नाही. त्यात तो एवढा गुरफटतो कि, त्याला वाटते हेच सर्वस्व परब्रम्ह आहे. यातच सर्वस्व स्थावर जंगम संपत्ती आली. या व्यक्त धनासाठी कोर्ट कचेऱ्या, भानगडी वाढतात. भांडणे होतात. एवढे जरी झाले, तरी व्यक्त धन त्याच्याबरोबर जाते कां? …
बाबा - सत् कर्तव्यापासून दूर कोण नेत असेल तर ते एकच, धन ! धन जर मानवाजवळ असले, तर त्याला मान मरातब मिळतो. त्याची प्रसिद्धी होते. त्याला सर्वस्व चाहतात. सर्व लोक मान देतात. रामदास स्वामींनी म्हटलेले आहे, “मरावे परि किर्ती रुपे उरावे !” त्यांनी किर्ती मिळवली. ते आपल्यामध्ये अजून ताजे आहेत. त्यांनी जी किर्ती मिळविली, नाव…
रामदास, ज्ञानदेव यांचे उदाहरण घ्या. ते कसे नि:ष्काम होते. त्यांची भावना नि:ष्काम होती. पार्थाला सुद्धा भगवंताने सांगितले, “तुझा हा सर्वस्व भ्रम आहे. तुला फक्त निमित्ताला उभे केले आहे. तू फक्त निमित्तासी कारण आहेस, मारविता मीच जाण, ते कसे ते बघ.” लाघवी रूप धारण केले. दृश्य रूप प्रगट केले. पण, त्याला पाहता येईना. त्यांनी त्याला…
आपण सर्वस्व दृश्य आहोत. जडत्व आहोत. दृश्य हे सर्व जग आहे. चर अचर सुद्धा दृश्य आहे. ज्याला हालचाल नाही ते निर्जीव आणि ज्याला हालचाल आहे, ते सजीव. हे सुद्धा दृश्य आहे. आपल्या गेल्या जन्मीचे जे प्रारब्ध त्याप्रमाणे या योनीत सत फळ मिळत असते आणि ते समर्थ देतात. समर्थ म्हणतात, “मी कोणाचाही ऋणी नाही. ज्याच्या त्याच्या…
आज जे काही सांगत आहे, त्यावर मन:पूर्वक विचार करा. आपणालाच आपली उत्तरे मिळतील. सत् मार्ग कसा आहे, त्याची जाणीव मिळेल.
आपले गुरू कोण? ज्यांच्यापासून अखंड ध्वनी, अनुग्रह मिळाला, तेच आपले गुरु होय. प्रथम गुरूंचे दर्शन, नंतर पुढील सर्व ! …
श्री सद्गुरू समर्थ दत्त जयंती उत्सव –
आजचा शुभदिन अवतार कार्यासाठी आहे. एकंदर दोन शुभदिन होय. आपले सेवेकरी कसेही असोत, हा दिवस साजरा करतात. वेडी वाकडी का होईना, सेवा करतात. ती पूर्णत्वाने सत आहे.
आज दर्शनाची मोकळीक आहे. प्रत्येकाने धडपड करा. सत मार्गानें वाटचाल करा. तुम्हीं सत…
आपले गुरु कोण? त्यांना कोणत्या तऱ्हेने कोणत्या मार्गाने पहावे. ते पहाण्यासाठी प्रत्येक मानवाने धडपड नको का करायला? ज्याला शरण, ज्यांनी अखण्ड नामाचा ध्वनी दिला, ज्यांचा शिरी हस्त पडला, तेच आपले मालिक, तेच आपले सदगुरू होय. ते पहाण्यासाठी धडपड करा. म्हणजेच मुक्तीचा मार्ग सापडेल. नाहीतर नाही.
भक्ती सोपी…
आत्मा बाहेर पडताना, प्रकृती अंगापासून बाजूला होताना, त्यावेळेस ज्योतीला तेज चढते. बाजूला झाल्यावर ज्योत निस्तेज बनते. ती कां? अविनाशी आत्मा हृदयरुपी पिंजऱ्यातून बाहेर पडल्यानंतर तेज कोठून राहणार? हा आत्मा आहे तोपर्यंत चलन वलन राहते.
मानव जर ईश्वर असेल, तर त्याची ही स्थिती का असावी? अविनाशी आत्मा शांत असतो.…
३१) महामुनी इंद्रजाल – मालकांशी लबाडी केली. खोटे बोललो. जी वस्तू निषिद्ध ती खाण्यात आली.
३२) महामुनी जगदेश्वर – मालकांचे आदेश होते. प्रत्येकाला सत् मार्ग दाखविणे. असत कृती न करणे प्रत्येक गोष्ट सताशिवाय दिसता कामा नये. असे असताना एकाही ज्योतीला सताचे वळण दाखविले नाही. मी ही सत् मार्गाने गेलो नाही.
३३) महामुनी चक्रवर्ती – जे…
२१) राजयोगी अरुण – मंत्र तंत्र, ऋध्दी सिध्दी याच्या सहाय्याने एका पुरुष ज्योतींची आत्महत्या करण्यात आली. यामुळे ही स्थिती ! आमच्या देखत राम कृष्ण अवतार झालेले आहेत. जे मालिक आहेत, ते पंचमहाभूतांच्या पुतळ्यांत विखूरले आहेत, त्याच्या पलीकडे अकराव्या द्वारात स्थिर होऊन, त्याच्याही पलीकडे ते आहेत. अशा दयाघन शक्तिचे आदेश धुडकावणे किती अघोरी पाप आहे. स्थूलात…
११) महामुनी गोपाळ - सेवेकऱ्यांत मुख्य म्हणून माझी निवड झाली होती. आदेश न मानता, मी कोणीतरी आहे, माझ्याशिवाय कार्य होत नाही, असा अहंपणा झाला. कार्याबद्दल विचारणा झाली असताना, जरी कार्य केले नसताना, झाले म्हणून सांगितले, त्यामुळे ही स्थिती !
१२) महामुनी मंगेश्वर – समर्थांचा सेवेकरी असताना सुद्धा इतर सेवेकऱ्यांबद्दल मनात द्वेष, द्वैत भावना…
१) संगमेश्वर मुनी – अखंड दर्शन – आसनाची सेवा ही इच्छा. अनुग्रह झाल्यानंतर सर्वस्वाची जाणीव असताना देखील अहंपणा आला. मी कोणीतरी विशेष आहे असे वाटले म्हणून ही स्थिती झाली.
२) महामुनी सुनीस्क – प्रत्यक्ष सद्गुरु अनुग्रह देण्यास आले असताना उध्दटपणा झाला. तरी माऊली शांत होती. अनुग्रह दिला. अखंड नाम दिले. कांहीं काळानंतर प्रत्यक्ष…