मग, स्वधर्म श्रेष्ठ कां परधर्म? जो सत् प्रविण आहे, सत् पुत्र आहे, सतभक्त आहे, त्याला कसलीही उणीव पडणार नाही. उणीव भासू देणार नाही. ज्ञानेश्वरांनी विचारणा केलेली आहे, राजाची कांता दारोदारी भिक मागत फिरेल कां? तिच्या मनाजोगती सिध्दी पावेल कि नाही? का तो भिक्षांदेही असतो? पण कल्पतरु तळवटी बसल्यानंतर त्याची भावना कुठेकुठे जाते?
पण कल्पतरु तळवटी…….यांत मार्ग दोन आहेत – जो सत् कल्पवृक्षाखाली बसला, तो सत् मार्गाने जाणारा असतो, जो अघोर कल्पवृक्षाखाली बसला, तो अघोर कल्पनेच्या पाठीमागे लागून हैवान बनतो. मग, तो स्वयम् तत्वापर्यंत पोहोचू शकेल का? पोहचू शकणार नाही.
कल्प, कल्पना, स्वयम् अन् पर म्हटल्यानंतर तुझे माझे निर्माण झालेच की नाही? म्हणून आपणाला जे साधे, सोपे, सुलभ आहे, तोच मार्ग अवलंब करावयाचा आहे.
भयावह म्हणजे भटकतो आहे. यात काय आहे? त्यात काय आहे? अशी भावना असते, तेव्हा ती ज्योत अशी भटकते. अशी ज्योत सतात निमग्न होईल का? जो सत् आहे, ज्याला सताचा प्रकाश आहे, तो स्वयम् तत्वाच्याच पाठीमागे असतो, त्याच्यासाठी स्वयम् तत्व दिलदार आहे, पण जे पर आहे ते पळ काढतेच की नाही? या ठिकाणी आसनाच्या सानिध्यात घेतले का? तर नाही. या ठिकाणी अघोराला थारा नाही. मात्र आसना सानिध्यात आहेत, त्यांनी आपल्या मार्गाची चाकोरी ढळू देऊ नये. जर ढळवली, तर त्यांच्यासारखा अभागी तोच ! (पुढे सुरु….३)©️