मानवाने सुख आणि दुःख हे दोन विभाग केलेले आहेत. पण सुख कशाला आणि दुःख कशाला म्हटले आहे? कोट्याधीश हा सुखी आहे का? मग सुखी कोणाला म्हटले आहे? कोट्याधीश सुद्धा सुखी नाही. संपत्ती रेलचेल असली तरी तो दु:खी असतो. आणखी आणखी हे सारखे त्याच्या डोक्यात भरलेले असते. दुःखाची व्याख्या म्हणजे सदोदीत त्रास, काबाडकष्ट. ही दुःखाची व्याख्या आहे.
पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे जे दुःख, ते सुद्धा निवारण होते. निवारण करू शकतो. सत सुख म्हणजे भक्ती मार्गाने जाणे. सद्गुरुना डोळे भरून पाहणे. एकचित्त लावून बसणे. त्यालाच ते सुख मिळते. देहाला, जडत्वाला विसरला की त्या सुखाची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. तेच खरे सच्चिदानंद सुख होय. हे करायला मानवाला त्रास होतो, पण तो त्रास एका क्षणात दूर होतो. त्या सुख सागरात डुंबू लागला मग मात्र त्याला कशाचीही चिंता भेडसावत नाही. तो सदा सुखी असतो. म्हणून सुख पाहिजे ते कोणते सुख पाहिजे? याचा विचार सेवेकऱ्यांनी करावा. (समाप्त) ©️