अलख – ज्या ठिकाणी जागृती तेथेच सत् ! ज्या ठिकाणी नाही, तेथे सांगण्याची जरूरी नाही.
सत् तत्व सर्व ठिकाणी आहे. सत् वलयात प्रगट होते. असत्यामध्ये सत् हे सुशुप्तावस्थेत असते. सत् ते सर्व ठिकाणी भरले आहे.
राजशी ज्योती, त्याही प्रगट आहेत ना? मग त्यांना दानव, अघोरी का म्हणायचे? उत्पत्ती, स्थिती व लय कोणत्या तत्वात आहे?
ज्यावेळेस भूतल निर्माण होते, त्यावेळेला, जसे वलय, त्याच तऱ्हेने तत्व निर्माण होते. असत तत्व झोपले असले, म्हणजे आपण करतो तेच सत् आहे असे सत् तत्वाला वाटते, अशी जाणीव होते.
ह्या दरबारामध्ये कृती, बोल सर्व सत् जाणीवही सत् आहे. असत्याच्या पाठी लागून, सत् शोधावयाचे असते काय? (समाप्त) ©️