शकुंतला – स्थूलातील प्रत्येक ज्योतीला सुख दुःख संसार असतो. परंतु संसारात प्रत्येकाला सुख पाहिजे असते. सध्याच्या मानवाला संसारात सुखच आहे. त्या अरण्यातील भयंकर श्वापदे, वाघ, सिंह यांची आठवण झाल्यानंतर विचित्र स्थिती निर्माण होते. त्यावेळेला इतके अतोनात कष्ट काढले, दुःख भोगले, तरी प्रत्यक्ष पित्याला दया आली नाही. ज्या ठिकाणी असत, त्या ठिकाणी आदर तरी कां द्यावा?
कर्तव्याच्या ठिकाणी मायावी नाते नाही. त्यांना आदर द्यावा पण तो कोणत्या वेळी? प्रत्यक्ष सद्गुरुना बनविणे महान अघोरी चूक आहे. अनेक जन्म घेतले तरी, क्षमा होणे कठीण. पूर्वी अशी गती होती. पिता माता कोणी असो, सताच्या बाहेर गेल्यानंतर महान शिक्षा होत असे. कण्वमुनींच्या आश्रमात सुख होते. पण अरण्यवास भोगताना सर्वस्व दुःख आठवले. अनुभवले. परंतु परम् दयाघन माऊलीने सर्व दुःखातून पूर्णत्वाने सुटका केली. (समाप्त)©️