या कोकणातील आसनाच्या कर्तव्याच्या बाबतीत आसनाधिस्त नाराज आहेत. पण त्यांना सांगणे आहे की, आपण बिलकुल नाराजी पत्करू नये. कर्तव्य करणारे, करून घेणारे फार निराळे आहेत. आपण फक्त देखभाल करीत राहणे. मी प्रत्यक्ष राम अवतारात असताना असेच केले आहे. मला ज्या ठिकाणी अडचणी आल्या, अडचणी निर्माण झाल्या त्या मी माझ्या सद्गुरूंना निवेदन केल्या. अन् त्यांच्या संदेशप्रमाणे कर्तव्य परायणता साधून सर्वस्व कर्तव्य रेटत नेले.
मुंबई आणि सातारा येथे कोणती गती झाली याची आपणाला जाणीव आहे. तद्वतच तशी तऱ्हा आता कोकणात चालली आहे. पण लक्षात ठेवा, अखेर विजय सताचाच असतो. मुंबई व सातारा या ठिकाणी विचित्र तऱ्हा निर्माण झाली होती. पण अखेर सताचाच विजय झाला. हे संदेश आपण कोकणातील सेवेकऱ्यांना देणे. पण नाराजी पत्करू नये. पुढे काय होत आहे हे प्रत्यक्ष पहा.
मी अनंत रूपे, अनंत नामाने नटलेलो आहे. माझा अंतपार कोणालाही नाही. परंतु मी प्रत्यक्ष मृत्यू गोलार्धात जगदोध्दारासाठी जरी अवतार घेतला म्हणून सताची पिछेहाट झाली का? हेच ओळखून कर्तव्य जोमाने आणि धीराने रेटीत चला. यश अखेर तुमचेच आहे.
हल्ली महान तऱ्हेचे शुद्धीकरण चालू आहे. त्यामध्ये आसनाधिस्त नाराज होतात, पण पहा, आमच्या अवतार कार्याच्या वेळी प्रत्यक्ष स्थूलांगी समोरा समोर लढाई होत होती, पण नाराजी न पत्करता आम्ही आमचे कर्तव्य म्हणून झगडत होतो. आता तेच कार्य या ठिकाणी होत आहे. (पुढे सुरु…२)©️