तुकोबाला विश्वास होता, किती जरी त्रास झाला तरी त्याने आपल्या कर्तव्याला पाठ दिली का? तो आपल्या नादातच होता. कधी संपत्तीला भाळला होता का? धनद्रव्याला लुब्ध झाला होता का? कां झाला नव्हता? पण ती ज्योत कधी उपाशी राहिली होती का? मेणाहूनी मऊ, कापसापेक्षाही मऊ असा सेवेकरी होईल, त्यावेळी त्याला कळेल. जो मेणापेक्षाही मऊ सेवेकरी आहे, त्यालाच हे कळेल. ती ज्योत त्या पात्रतेची होती. आपण त्या पात्रतेचा बनण्याचा प्रयत्न करा. पण हे एकदाच होत नसते.
बहुत सुकृतांची जोडी ! बहुत जन्मींचे सत् संचित साठल्यानंतर एवढी पात्रता निर्माण होते. एवढेच की, त्या तुकोबाला किती वेळा जन्म घ्यावा लागला असेल, किती वेळा मानवात पाठवावे लागले असेल, तेव्हाच ती ज्योत शुद्ध स्फटिका सारखी झाली. आता ती ज्योत कोठे आहे?
समर्थ केव्हा आपणात सामावून घेतात? समर्थमय बनेल व त्याचे कर्तव्य संपेल तेव्हाच ते त्या ज्योतीला सामावून घेतात. समर्थ त्यांचे कर्तव्य बघत असतात. जराही काळा डाग दिसणार नाही अशी पात्रता येईल तेव्हाच ते त्याला आपणात सामावून घेतात. तेव्हा सेवेकऱ्यांनी मायेला बगल देण्याचा प्रयत्न करावा. तदनंतर सर्वस्व होईल. (समाप्त) ©️