Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

नैतिक सत्य आणि भौतिक सत्य २ ©️

नैतिक सत्य आणि भौतिक सत्य २ ©️

श्री विठ्ठल – सर्वस्व ओंकार सत्य आहे हे म्हणता येईल का? ओंकार सत्य आहे म्हणून हे सत्य आहे. मानव सर्वस्व आकारी आहेत. ओम स्वरूप आकारी आहे, पण ओंकार स्वरूप मानव बनला का? मानव तत्वरुप बनला तर हजारो व्याप करण्याची काय आवश्यकता? ज्यांना शरण आहे, त्यांचे आदेश तळ हातावर झेलले, तर ओंकार स्वरूप होऊ शकतो, पण कशातच काय नाही, मग ओंकार पाहता येईल का?

एकच, जे अखंड सत आहे, तेच नैतिक सत्य आहे. तेच सत, त्यानेच भौतिक सत्य निर्माण केले आहे, म्हणून अखंड जे नाम तेच नैतिक सत्य आहे. ही मेख आपल्याला मिळाली अन अशा तऱ्हेने वाटचाल केली, तर ते का मिळणार नाही? मग ओंकार स्वरूप होणार नाही का? नैतिक सत्याची माहिती कुठून मिळते? सर्वस्वाचे निधान जे सत आहे, ते स्वतःच हस्तगत झाले, तर त्याच्यापासूनच ह्या सर्वस्वाचा उलगडा होईल.

सद्गुरु केले नाहीत, तर सर्व जाग्यावर रहाते. तेव्हा सद्गुरूं शिवाय ते सापडणार नाही. गुकार म्हणजे काय? म्हणजे आकाराला शरण गेल्याशिवाय ते कदापिही सापडणार नाही. निराकाराची गती मिळणार नाही. जे निराकार आहे, तेच नैतिक सत्य आहे. त्यांनीच हे निर्माण केले आहे. भौतिक जे आहे ते चमत्काराने नटलेले आहे. जे नैतिक सत्य आहे त्यांनी कर्तव्यासाठी तत्वे निर्माण केली आहेत.

पण मला वाईट वाटते की सताचा अंत कोणी घेतलेला नाही. हे दुःखाने का म्हणावे लागते तर त्यांची अन माझी हुज्जत झालेली आहे. सताला मान आणि अपमान पण नाही. पण आम्ही या दोन्ही तत्त्वाने नटलेलो होतो. ज्या वेळेला संदेश मिळाले की दुसरा विठ्ठल निर्माण करा, मग असे जे सत आहे त्याला काय म्हणावे? याची बरोबरी कोणी करील का? जे अखंड सत आहे ते थोड्याच अवधीत प्रगट होणार आहे, मग सर्वस्व समजेल. ©️

You cannot copy content of this page