ज्या भोजनाची मला आवड आहे, त्या भोजनाने माझी तृप्ती झाल्यानंतर येथपर्यंत येऊ शकतात. ते नाम, ते भोजन कोणत्या तऱ्हेने व्हायला पाहिजे? सर्वस्वाचा त्याग करून, जो का या एकातच रमला, तोच परम पदी पोहचू शकला. नाहीतर *नामस्मरण* करतो, परंतु मनाची भावना भलतीकडे असते नाम चालू असून देखील मन कशात तरी गुंतलेले आहे, तर काय उपयोग?
आजचा दिवस गेला, उद्या काय? मुला माणसांकडे लक्ष, इतर विचार? असे सर्व विचार करताना, तो नामात तल्लीन होऊ शकत नाही. नाम हे साधन आहे. या नामामुळेच कित्येकांचा उद्धार झाला आहे. जलात जरी टाकले तरी तो तरुण निघतो. नामाने महान महान पातकांचा सुद्धा नाश केला जातो. हे एकच नाम त्रिभुवन व्याप्त आहे आणि त्रिभुवन व्यापून देखील अलिप्त आहे. म्हणून आज आसनावरून नामाचा महिमा व त्यावर प्रवचन झाले आहे. आणखी मी काय विशेष सांगू? नाम घेतो म्हणून जमत नाही. ज्या ठिकाणी शरण त्या ठिकाणाला दृढ भाव धरून नामाची आठवण ठेवणें, नामस्मरण करणे, मनाची चल बिचल झाली तर त्या ठिकाणी अर्पण करणे, मग मन कोठेही धावू शकत नाही. ©️