सौ. माधवी – जगात ईश्वर नाही म्हणून चालणार नाही. सर्वांनी एकच निश्चय करणे. जरी मी सेवेकरी आहे तरी संसारात आहे. त्याच्यात जो वेळ मिळेल, तो सत्कार्यात घालवीन. असताची बाधा होऊ देणार नाही.
आपल्या स्थूलांगी सेवेकऱ्यात काहींचे एक तर काहींचे निराळे असते असे मालिक सांगतात, आसनाधीस्त सांगतात, पण घरातील कृती कोण पाहते? त्रिभुवनात एकही ठिकाण नाही की, त्या ठिकाणी मालिक नाहीत. सर्वस्व भावना मालिकमय झाल्यानंतर पहाल तिकडे सद्गुरु, पहाल तिकडे मालिक आहेत. जोपर्यंत ठाम नि:श्चय नाही, सत् मार्गाला लागत नाही, तोपर्यंत सताची जाणीव मिळणार नाही.
एकच, संसारात राहूनच परमार्थ साधा. सत् मार्गाने जा. मी सुद्धा एक सेवेकरीण आहे. कोणी महान नाही. ज्याच्या अंगात मी पणा, गर्व आहे, ज्याची भावना मी कोणी विशेष आहे, अशांची गती काय होते, हे आपण पहात आहोत. (पुढे सुरु….३)©️