आदेशाप्रमाणे मानवाला जन्माला घातला. जन्माला घातल्यानंतर पुढे ज्ञानबीजाचा अंश फेकला जातो. ज्ञानबीजाचा अंकुर फुटल्यानंतर, अशाप्रकारे सतामध्ये रममाण झाल्यानंतर तो सर्वस्व सारख्या दृष्टीने पाहतो. किती जरी मानवांनी त्रास दिला, तरी तो आपले कर्तव्य सोडून दुसऱ्या चाकोरीने जाईल काय? त्याला पूर्ण माहीत होते, हे कोण करते आहे. म्हणून संतांनी सत् चाकोरी कधीही सोडली नाही. हे सत्य आहे ना?
सत कर्तव्याला यश हे जरूर येणार. परंतु कोपिष्ट मुनीच्या शापामुळे वेळ लागला आहे. त्यामुळे सर्वांची मने नाराज झाली आहेत. माझे सुद्धा चुकलेले आहे. काही कारणास्तव हे करावे लागले. याचे स्पष्टीकरण होणारच आहे.
मी अदृश्य आहे. सेवेकरी सुद्धा मालिक काय करतात याची सद्गुरू कृपेने जाणीव घेतात. कर्तव्ये पुढे का ढकलली जातात, याची जाणीव घेतात, जाणतात.
या दरबारातील सेवेकऱ्यांनो, आसनाधिस्त सांगतील त्याप्रमाणे वागून आपल्या कर्तव्यात जागृत राहणे, हे आपले कर्तव्य आहे. आपल्या भक्तीत रममाण राहणे. आपले पाऊल इकडे तिकडे ढळता कामा नये. सेवा करून घेणारे, कर्तव्य करून घेणारे, सताची वाट दाखविणारे कोण? हे सेवेकऱ्याने ओळखावे. म्हणजे कल्पना रहित झाल्यानंतर त्या सेवेकऱ्याला काही सांगता येत नाही की सत् हेच अखंड आहे की, त्याला खंड आहे. सत् हे स्वयमेव आहे. मग अशा ठिकाणी आपण रममाण झाल्यानंतर अघोर ज्योती, भुत-पिशाश्च सानिध्यात येऊ शकतील का? मग सेवेकऱ्याने विचार का करावा? (समाप्त)©️