आसन म्हणजे साधी सुधी गोष्ट नव्हे. आसनाला अधिकार काय आहेत? कोणी दिधले? कशाकरीता दिले? याचा सेवेकऱ्यानी अंत लावला आहे का? या दरबारातील प्रत्येक ज्योत प्रकाशित आहे. फक्त संचिताप्रमाणे, पूर्व कर्माप्रमाणे वाणीने व ओघाने फळ प्राप्त झाले आहे.
या दरबारात, सानिध्यात येण्याला पूर्व जन्मिचा ठेवा लागतो. प्रत्येक अणु रेणू चत्वार खाणीत ह्या दरबाराची व्याप्ती आहे. सर्व ठिकाणी याची व्याप्ती आहे. या दरबारात स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण यातील सुद्धा ज्योती आहेत. त्यांना ह्या दरबारचा अंत घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आसन ते आसनच आहे. याचा अंत कोणालाही घेता येणार नाही. म्हटले तर फारच जवळ आहे, नाहीतर फार दूर दूर आहे.
ज्याप्रमाणे हिरा ओळखण्यासाठी, पैलू पाडण्यासाठी पारखी असावा लागतो, पैलू पाडण्यासाठी कारागिरच लागतो. कारागीर कोणत्या तऱ्हेचा असावा लागतो? त्याची कृती ओळखून प्रत्येक सेवेकऱ्याने आचरण करावयास पाहिजे. ह्या दरबारचा तो अधिकार आहे. ©️