ज्याला आदेश पटले, तो सर्वस्व आपल्या सद्गुरु चरणांवर अर्पण करतो, त्यालाच आदेशाची किंमत व ओळख असते. आदेशाची प्रत्येक सेवेकरी वाट पाहत असतात. पुढच्या दरबारात आदेशावर आणखी प्रवचन होईल.
“आदेश” म्हटल्या नंतर त्याचा ध्वनी दुंदुभी त्रिभुवना सहित २१ स्वर्ग, व सप्त पाताळ या ठिकाणी घुमतो. हे सेवेकऱ्याना माहित नाही काय? ओळख करून घेतली असे म्हटले तर त्याला आदेशाची किंमत कळली पाहिजे. तो आपल्या सद्गुरुचे बोल झेलण्या करीता सर्वस्व पणाला लावतो. असे असताना, आदेश का पाळले जात नाहीत? आदेशा पासून हूकल्या नंतर सदगुरू पासून एक अंगुळी दूर राहतो. जवळ आल्या नंतर कोणती स्थिती होते? एक आदेश चुकला तर तो सेवेकरी पदच्युत होत असतो. यावरून सेवेकऱ्याने ओळखायचे असते. आपल्यालाच का सांगितले? का आदेश दिलेत? सहज बोल असतात. तो फार अमूल्य ठेवा असतो. हे सेवेकऱ्यास समजावयास पाहिजे. एका नावावर आदेश दिल्या नंतर साधा असो, जो सेवेकरी त्या आदेशाला अखंडत्वाने खडा असतो, तो सेवेकरी धन्य होय.
सदगुरू मुखातून निघालेले बोल, कोणत्याही सेवेकऱ्याने भुलता कामा नयेत. बाल मुनींची तप:श्चर्या किती झाली आहे. आपल्या सद्गुरुनाही दास बनविण्याची त्यांची कृती आहे. असे असताना, आसनावरून निघालेला आदेश झेलण्यासाठी किती धडपडत असतात. ©️