आदेशावर आतापर्यंत तीन दरबारात प्रवचन झाले. एवढे असूनही दरबाराचे व आदेशाचे महत्व राखले जात नाही याबद्दल खेद वाटतो. आदेश म्हटल्यानंतर आदेश कोठून आला? त्याची जाणीव घेण्यासाठी तीन ताळ, सप्त पाताळ, एकवीस स्वर्ग, चत्वार खाणी यांच्यातील प्रत्येक ज्योत आदेश कोठून आला, त्याची जाणीव घेते. आदेश हा ध्वनी उमटल्यानंतर, घुमल्यानंतर ज्या समाधीत ज्योती आहेत, त्या खडबडून जाग्या होऊन आदेश कोठून आणि कोणाला आला याची जाणीव मिळाल्या नंतर ज्याला जो आदेश आहे, ती ज्योत दरबारात हजर होते. यालाच महत्व आहे. आदेश सहज दिला जातो. याची सेवेकऱ्यास जाणीव नाही. परंतु जे सहज बोल तेच अमृततुल्य असतात. त्याला काहीतरी महत्त्व असते. जो सेवेकरी हे ओळखत असतो त्याला आदेशाचे महत्व पटले आहे. सरळ सहज बोल पण ते फार मोलाचे असतात. सेवेकरी त्याला कवडी किंमत देईल. तो सदगुरू सेवेतून पदच्युत होतो. जे तपोबल केले, जी सत् भक्ती केली, जी तप:श्चर्या केली. त्याला सर्वस्वी मुकतो. एक आदेश धुडकावला तर काय होईल? असे सेवेकऱ्याने समजू नये.
एक आदेश धुडकावला तर तो सर्व सामर्थ्या पासून पदच्युत होतो. ते सामर्थ्य मिळविण्यासाठी कित्येक वर्षे घालवावी लागतात. एक आदेश चुकला तर तो काही काळ तरी सदगुरू पासून दुरावला जातो. हे प्रत्येक सेवेकऱ्याने ध्यानात ठेवावे. आदेश कोणालाही असो, आपल्या सद्गुरु मुखातून निघालेला महत्त्वाचा असतो. मानवाला साधे सोपे तत्व पाळता येत नाही. कित्येक ऋषी, मुनींनी आपल्या सद्गुरु चरणांजवळ जाण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. मानवाला अनुभव देण्यासाठी आपल्या दरबारात जे कार्य चालले आहे, त्या कार्याच्या आदेशासाठी अखंड ज्योती राबत आहेत. आपली माऊली फार दयाघन आहे. याची खूणगाठ म्हणून आताचे कलियुगी आदेश फारच सौम्य सुटतात. गत:कालचा जर विचार केला तर त्यावेळी दिलेले आदेश किती महत्त्वाचे असतात, त्यामानाने आताचे आदेश साधे सोपे असतात. ते सुद्धा मानवांना पाळता येत नाहीत. आपल्या सद्गुरु चरणात लीन झाल्यानंतर सद्गुरूंची जाणीव घेणाऱ्या प्रकाशमान ज्योती आहेत. त्यातील एकानेही सद्गुरूंची जाणीव करून घेतली नाही. आपल्या सद्गुरु चरणात लीन, निपुण, सानिध्यात असणारे आदेशाला अंतरतात. आदेशाला दूर लोटतात. म्हणून असे म्हणावे लागते. ©️