अखंड सेवा – अखंड सेवा ही दिलेलीच असते. परत मागण्याची जरुरी नसते. ती दिलेली असते. सेवेकऱ्यांना ती टिकविता येत नाही, म्हणून त्यांना असे वाटते आणि जरी नसेल, तरी मालिक, सद्गुरु हे देतातच. दिलेल्या प्रमाणे सेवेकऱ्याने ती सेवा टिकविली पाहिजे. अखंड सेवा दिली आहे, पण त्या अखंडत्वाचा उपभोग घेता आला पाहिजे. ज्याला कधीही खंड नाही, असे ते अखंड सेवेकऱ्याला दिलेलेच असते. त्या सेवेत खंड आहे का?
भक्ती करणे हा मानवाचा हक्क आहे, अधिकार आहे. तो कुणीही हिरावून घेत नाही. घेतला जाणार नाही. पण भक्ती म्हणजे काय? हे अजून काही मानवांना समजले नाही. काही मानव हे अद्वैताच्या मागे आहेत. काही द्वैताच्या मागे आहेत, त्यांना सत मार्ग सापडणार नाही. आपल्याला जे अखंड भक्तीचे वळण दिले आहे, ते सत् आहे. तेच अद्वैत आहे. तिच अखंड सेवा आहे. तिच सत् तिजोरी आहे. सेवेकऱ्यांनी त्याचा उजाळा करणे. ती तिजोरी कधी काठोकाठ भरेल, याचीच सेवेकर्यांनी अपेक्षा करणे. ©️