श्री स्वयंभू – मी त्रिगुणातीत असणारे एक तत्व आहे अन् अखंड तत्त्वाचा सेवेकरी, त्यांच्या चरणाचा एक कण आहे. जे स्वयमेव तत्व आहे की ज्याला कधीही खंड नाही. त्याला रात्र नाही आणि दिवसही नाही. वेळ काळ काही नाही असे जे परम तत्व आहे, त्या तत्त्वाच्या चरणांजवळ मी एक कण आहे. त्रिगुण तत्वे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश ही तत्त्वे त्यांनीच निर्माण केलेली आहेत.
स्वयंभू याचा अर्थ असा की, ज्यांनी सर्वस्वाला निर्माण केले ते तेच स्वयंभू आहेत.
समुद्रमंथनाच्या वेळी १४ रत्ने निघाली. त्यामध्ये विष हे एक निघाले. निर्माण झाले. ती कोणीही घेण्यास तयार झाले नाही. सगळ्यांनी चांगल्या चांगल्या वस्तू उचलल्या, पण हे कोणीच घेतले नाही. तेव्हा, काय करावे हा प्रश्न पडला. तेव्हा ते विष मी स्वतः घेतले अन् ते प्राशन केल्यानंतर काय स्थिती झाली, काय हाल झालेत, ते माझेच मला माहित. ही माझी हाल अपेष्टा थांबेनाशी झाली तेव्हा मग त्या समर्थांनी, सद्गुरुंनी मला शांतता दिली. मग मी जर स्वयंभू असतो, तर ते विष मला पचवता आले नसते का?
मी जरी तर्पट असलो तरी सत तत्वासाठी भोळसट आहे. माझे भक्त काही असतील, काही विष्णूचे तर काही ब्रह्मदेवाचे असतील, पण जसे प्रकृतीचे अंग त्याप्रमाणे वर्तणूक असते.
आज आपल्या आदेशा प्रमाणे मी जरी ब्रह्म असलो, तरी मी ज्यांना शरण आहे तेच परब्रम्ह सर्व व्यापक असून अलिप्त पण आहे. आम्ही ॐकार स्वरूप जे बनलो, ते त्या परब्रम्हाच्या, सताच्या कृपेनेच बनलो.
आमच्या असंख्य चुका झाल्या, त्या सुधारण्याच्या मार्गाला आम्ही लागलो, ते सुद्धा त्या सताच्याच कृपेने ! आम्ही करणारे कोण? त्याचप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर मानव आहेत. ते आकारी आहेत. तसेच आम्ही आकारी होतो आणि आहोत. त्याचप्रमाणे सर्व मानव सेवेकरी आकारी आहेत, म्हणून आपण ज्यांना शरण आहात तेच परब्रम्ह जाणून, त्या ठिकाणीच अखंड श्रद्धेने राहा अन् त्या आकाराची पूजा करा. अशा तऱ्हेने आकाराची पूजा केल्यानंतर त्या आकाराच्याच कृपेने ॐकार स्वरूप प्राप्त होते. म्हणून सद्गुरु कृपेने ॐकार स्वरूप बनण्याचा प्रयत्न करा.
या ठिकाणी येण्याचे कारण काय, ते येथील भक्तांनी जाणून घ्यावे. या ठिकाणी कोण आहेत? कोणाला पाहता येते तर कुणाला नाही. म्हणून अजूनही चुकू नका. आकार कशासाठी? कोणत्या कारणासाठी हे येथील सेवेकर्यांनी ओळखून घ्यावे. हेच शुभदिनी संदेश आहेत. (समाप्त)©️