त्यावेळचे युग सत् युग होते. त्यावेळी थोडीशी जरी असताची बाधा झाली, तरी अघोरी शिक्षा होत असे. सध्याच्या मानवांना फार सुट आहे. पूर्वी कडक शिक्षा होती. त्यामुळे ते वळणावर आले. सेवेकऱ्यांना हाच संदेश आहे. सत् कृती करा. सत् मार्गाने जा. परमार्थ कुठे आहे, याची जाणीव आपोआप मिळेल. संसारात राहूनच परमार्थ साधता येतो. हे प्रत्येकांने लक्षात ठेवणे.
या आसनाचा सेवेकरी बाहेर गेल्यानंतर, त्याला सद्गूरु पदानेच मान मिळाला पाहिजे. अखंड नामाचा उजाळा करा. पुढची गती आपोआप मालिक देतील. त्याची चिंता करू नका. सेवेकऱ्याची आठवण पाठीमागे आली पाहिजे. तिच खरी! तोंडावरची काय उपयोगाची?
सेवेकरी मानवांत, स्थुलात असे पर्यंत ठाम निश्चय करा. या कुडीतून बाहेर पडेपर्यंत, एकदा तरी सद्गुरू चरणांचा ठाव घेऊच. ज्यावेळी सेवेकरी पूर्णांगी शुध्द, त्यावेळी त्याला मालिक दूर नाहीत. त्यांना पाहण्याची धडपड करा, म्हणजे सत् काय आहे याची जाणीव मिळेल.
मालकांचा संसार फार अफाट आहे. सबंध त्रिभुवनाची उलथापालथ करावी लागते. कोणाला कोणत्या ठिकाणी टाकावे याचा विचार करावा लागतो. जो सत् पणा बाळगावयाचा तोच सेवेकऱ्यांनी बाळगा. संसारात असताना मालिक काही कमी पडू देणार नाहीत. तेच संसार चालवतील. सेवेकऱ्याला उपाशी मरू देणार नाहीत. जर सेवेकरी दुसरीकडे भिक मागावयास गेला तर सद्गुरू काय कामाचे?(समाप्त)©️