श्री समर्थ मालिक – सेवेकऱ्याला संसारात सर्वस्व पहावे लागते. ते करायलाच पाहिजे. जी जी संकटे येतील, ती ती सर्व बाजूला सारून, हे तुला केलेच पाहिजे. कोणत्याही मानवाला संसार करूनच परमार्थ साधावयाचा आहे.
सेवेकरी सत् मार्गी असताना इतर मानव त्रास देतात. टवाळी करतात. याप्रमाणे सारखी त्यांची टवाळी चाललेली असते की, इतर दरबार नाहीत कां? त्याठिकाणी एका क्षणात कार्य होते. त्याला भाळावयाचे नसते. जरी मी गरीब असलो, तरी संसार कोणालाही सुटलेला नाही. सुटू शकणार नाही. त्याचा कंटाळा करु नये.
प्रत्यक्ष मालकांनाही संसार सुटलेला नाही. हा कली आहे. या कलीयुगातील मानव आहे. यांत संसार करणे कठीण वाटते. महागाई भरमसाट वाढलेली आहे. तरी सुद्धा खचून जाऊ नका. सर्वस्व पुरविणारे मालिक आहेत. हा ठाम आणि अढळ नि:श्चय ठेवा. सताचा पाया मजबूत ठेवा. परमार्थ साधता येईल. परमार्थ म्हटल्यास अत्यंत जवळ, नाहीतर फार लांब आहे.
शुध्दीकरणात जे सत् पुरुष मिळतात, त्यांनाही संसार होता. बायका, मुलें होती. त्यांनी परमार्थाचा शोध केलाच ना? ©️