कर्तव्याची फळे आपोआप मिळणार आहेत. कर्तव्य कितीही कठोर व कठीण असेल, तरी त्याचे फळ आपणास पूर्णपणे मिळणार आहे. दरबार हा उज्वल स्थितीत चालला असताना सेवेकरी हा सेवेकरीच असावा लागतो.
या दरबारचा सेवेकरी सत् शिष्य असतो. हे अजमावयाचे असते. कितीही लाघव झाले, ह्या दरबारचा सेवेकरी भीत नाही. त्याला ठाव देत नाही. प्रत्यक्ष मालीक पाठीशी असतात. ज्यावेळी प्रत्यक्ष रुप समोर असते, लाघवी रुप समोर असते, त्याच्यातील फरक ओळखला असेलच.
माया अनेक रूपांनी नटलेली आहे. तिला कोणत्याही तऱ्हेने कसोटी घ्यावयाची असते. जो सेवेकरी तिच्या अधिन होतो, तो मायेमध्ये गुरफटतो. ती त्याला अनेक तऱ्हेने व्यापून सोडते.
ह्या दरबाराचे सेवेकरी मायेला भीक घालीत नाहीत. असे होण्याचे कारण, तिचे अधिकार होत. त्याच अधिकाराने छाननी करत असते.
प्रत्यक्ष समर्थ पाठीवर असताना सुद्धा हा सत् शिष्य आहे की नाही, हा आपल्या सद्गुरु चरणावर किती लीन आहे, हेच तिला अजमावयाचे असते. ज्या ज्या वेळी मुळाश्रमात जाताना सेवेक ऱ्या नच्या आढळण्यात अशी रूपे आली, त्याच वेळी त्याने विचारायचे की, मालीक हे काय आहे? मग अशा तऱ्हेची रूपे राहू शकतील काय? ©️