श्री समर्थ मालिक – मी नाही आकाशी, मी नाही पाताळी ! इतकेच की भक्त त्या पात्रतेचा असेल तर, निष्काम, परिपूर्ण, सत स्फटिकासारखी वर्तणूक असेल, तर मी त्या भक्ताला दूर नाही. आकाशीपण नाही आणि पाताळीपण नाही, तर मला सानिध्यात पाहता येईल, असे काही भक्तांनी सुद्धा सांगितले आहे. मी कोठे नाही असे ठिकाण नाही. इतकेच आहे की ओळखणारा पाहिजे. याच्या पलीकडे काही नाही.
प्रकृती अंग अनेक तऱ्हेने असे नटलेले तत्व कोणते आहे अन् प्रकृतीचे अंत:र्यामी कोण आहे? अन् ते का आहे? अनंत तऱ्हेने प्रकृती नटविली ती मीच ना? त्या प्रकृतीच्या अंत:र्यामी मीच आहे ना? मग अनंत रूपाने प्रकृती का नटविली? याचे कारण एकच, अनेक वेळेला सांगितले आहे.
मानव दोन तऱ्हेचे आहेत. भक्तीची अंगे दोन आहेत. सत् आणि असत ! असत भक्तीने मानव हैवान बनतो. मग तो प्रकृतीच्या अंगाने गेला की नाही? प्रकृती अहंकारी आहे. ती मनाच्या आधीन गेल्याने घसरली आहे. म्हणून अनंत रूपाने ते नटलेले आहे. अशा मानवा करिता ८३ लक्ष योनी नटविल्या आहेत. त्याची पूर्णत्वाने रग जिरल्यानंतर त्याला मानव योनीत टाकतात. मुकी बिचारी. कोणीही हाका. मग त्याच्या अंत:र्यामी कोण आहे? मारतो कोण? मग त्याचा मार मला लागतो का?
मी अभेद्य आहे. अभिन्न आहे. मला कोणी धरू शकत नाही. मला कोणी पकडू शकत नाही. मला जसा पाहाल, तसा मी आहे. अन् म्हणून सेवेकऱ्यांनी आपल्याला जे घ्यावयाचे, ते घ्यावे. वाईट सोडून द्यावे. सत चरणांचा अंत घ्या. चरण सापडले की पुढे वाटचाल आपोआप होईल. (पुढे सुरु…..२) ©️