रामदास, ज्ञानदेव हे निष्काम होते? त्यांची भावना निष्काम होती. पार्थाला सुद्धा भगवंताने सांगितले, “तू फक्त निमित्तासी कारण आहेस. तुझा हा सर्वस्व भ्रम आहे. तुला फक्त निमित्ताला उभे केले आहे. मारविता मीच आहे, ते कसे ते बघ.” लाघवी रूप धारण केले, दृश्य रूप प्रगट केले, पण त्याला पाहता येईना. त्यांनी त्याला धीर दिला. दिव्य दृष्टी दिली. तरी सुद्धा पाहता येईना. त्याला त्यांनी सांगितले, ”घाबरू नकोस.” याप्रमाणे त्याला आढावा मिळाला. जाणीव करून दिली. “पार्था, तू निमित्त मात्र आहेस.” हा पार्थाला त्यांनी चमत्कार करून दाखविला.
तसाच हल्लीच्या मानवाला चमत्कार लागतो. एवढे करून सुद्धा पार्थाला सांगितले, “तू जर केले नाहीस, तर तुझ्याकडूनच करून घेणार आहे.” तेव्हा हे सर्वस्व अव्यक्ताच्या आधीन आहे, पण हल्लीचा दृश्य मानव समर्थांना बनवतो. पण शेवटी तोच बनला जातो. आत्तापर्यंत समर्थांना कोणीही बनविलेले नाही.
मानवाला विचारले, तुझी चूक कोणती झाली? पण त्याला सांगायला लाज वाटते. आपल्या सद्गुरुना सांगण्यात लाज कसली? पण थोडीशी अब्रू आहे. मानव गर्विष्ठपणाने नटलेला आहे. तो “ग” ने बरबटलेला असतो. त्याला अब्रू असते. तेव्हा दृश्याला, गर्विष्ठाची ठेव पाहिजे का? तर नाही.
पण मानव म्हणतो, मी आहे. मी कोण हे त्याला सांगता येत नाही. पण जो आत वास करतो, तेच तुमचे गुप्तधन आहे. त्याला अब्रू आहे का? जो अब्रू म्हणतो, त्याला अहंकाराची भावना लपेटलेली असते. अहंकार रहित ज्योत निष्काम गतीने वाटचाल करते. अहंकार युक्त ज्योत शंकाकुल असते. पण दृश्याला दृश्यांची आवश्यकता जरी असली, तरी निष्काम गतीने वाटचाल केल्यास, आपली भावना निष्काम ठेवल्यास दूषण लागत नाही. ©️