मनू + ईष म्हणजेच मनुष्य ! मनुष्य हाच ईश्वर आहे. दुसरे ईश्वर कोण आहेत? ३३ कोटी दैवते काही काळाच्या पाठीमागे, मानवातच व्यवहार करीत होती. तेच दैवत बनले. ती चित् घन वस्तू ज्याला रूप नाही, रंग नाही, आकार विकार काही नाही, अशांचे वर्णन कोण करू शकणार?
परब्रम्ह शक्ती सर्व ठिकाणी – स्वर्ग मृत्यू पाताळात वावरते. ती कशी वावरते, याची जाणीव कशी मिळणार? ती कशी आहे, काय आहे याचे वर्णन काय हे कसे समजेल? माऊलीला आकार कोणता? चित् घन, चैतन्य, शुन्य आकार म्हटला तरी चालेल.
शून्याकारापासून धुंनधुनकार व त्यापासून ओंकार ! ओंकारा पासून माया ! मायेपासून त्रिगुण निर्माण झाले. तदनंतर पृथ्वीची रचना झाली. (गुरुगृह्य)
मानव सर्व मायारूपी आहेत. इथपर्यंत येण्याची शक्ती मानवात आहे काय? अशा या माऊलीचे वर्णन कोण करू शकणार? त्याचे रंग रूप कोणालाही सांगता येणार नाही. क्वचितच एखादा त्या परब्रह्मशक्तीसाठी तहानलेला असेल तरच दर्शन घेऊ शकेल. ते सुद्धा, त्याला एखादा चांगला मानव दाखविणारा मिळाला म्हणजे, जो पूर्णत्व पदाचा अधिकारी असेल (सद्गुरु), त्यालाच त्याची जाणीव मिळेल. चित् घन शक्ती कुठे नाही? सर्व ठिकाणी आहे. अशांचे वर्णन काय करावे? कसे करावे? ©️