श्री समर्थ मालिक – सेवेकरी दरबारात व दरबाराच्या बाहेर कसा वागतो? तर दरबारात घाबरतो व बाहेर घाबरत नाही. सेवेकरी येथे धीट व बाहेरही धीट पाहिजे. तो म्हणतो, बाहेर तरी कोण बोलणार आहे?
येथे दरबारात खूप प्रवचने होतात. येथे सत् सानिध्य आहे. येथे मी आहे व बाहेर पण मी आहे. परंतु जो सेवेकरी ठाम आहे, तो कोठेही असो, त्या सेवेकऱ्यास भीती नाही. जे सेवेकरी कर्तव्यासाठी ठाम आहेत, त्यांच्याकडूनच कर्तव्य करून घेतली जातात वा कर्तव्य करून घ्यावयाचे आहे. कर्तव्यात कसर नको.
संशयातीत सेवेकरी येथे असतात त्यांच्या मनाच्या आत कोण आहे? संशय असल्यामुळे सेवेकरी घाबरतात म्हणजेच ते अजून बाकी आहेत. इथून सर्वस्व घडत असते. सर्वस्व प्रकाशित ज्योती आहेत. पण कशापासून असे होत असते?
आपण एवढे सांगत असता, किती वर्षे इथे आहात. मग यांनी गती घेतली का की, आसनावर काय चालते? म्हणून तुम्हीच पहा आणि सांगा. सर्वस्व मी बोलत असतो.
कृती कृती म्हणजे काय? नामस्मरण होत नाही कारण बसणार कुठे? त्यासाठी बसावयास लागतेच असे नाही. तत्व – त्यामध्ये रममाण होणे गरजेचे आहे. तत्व सोडून ज्ञानी होता येईल का? तत्त्व न सांभाळल्यामुळे ठाम कसे होता येईल? आपली चार तत्वे प्रमुख आहेत – ज्याला ती ज्ञात आहेत, तो माझ्यापर्यंत येत असतो. ©️